‘मराठा सिर्फ दो बाते जानता है...’; 'भूज'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

12 Jul 2021 17:37:42

Bhuj_1  H x W:
 
 
मुंबई : गेले काही दिवस १९७१मध्ये भूज हल्ल्यावर आधारित ‘भूज - प्राईड ऑफ इंडिया’ या युद्धपटाची चर्चा होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देशभक्तीच्या भावनेने भरलेला या चित्रपटामध्ये अजय देवगण, संजय दत्त, शरद केळकर, सोनाक्षी सिंह आणि नोरा फतेही अशी मोठी कलाकारांची फौज आहे. सत्य कथेवर आधारित या चित्रपटामध्ये सैनिक आणि गावकऱ्यांनी दाखवलेले असामान्य साहस आणि शत्रूवर केलेला प्रहार या ट्रेलरमध्ये दिसतो. ट्रेलर प्रदर्शित होताच यामधील एक संवाद प्रसिद्ध होत आहे, “मराठ्याला फक्त दोनच गोष्टी माहिती आहेत. मारणे किंवा मरणे.”
 
 
 
 
 
 
 
 
या चित्रपटात विजय कर्णिकच्या भूमिकेत अजय देवगण दिसला आहे. तर नोरा फतेहीही या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारताना दिसणार आहे. गुजराती वेशभूषेत सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्तचा लूकही प्रभावशाली वाटत आहे. शरद केळकरही एका साहसी सैनिकाचे पात्र साकारत आहे. 'उरी' चित्रपटाला मिळालेल्या उत्तम यशानंतर आता आणखी एक युध्दपट येत आहे 'भूज द प्राईड ऑफ इंडिया'. अभिषेक दुधाइया 'भूज द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. यात १९७१ च्या भारत पाक युध्दाची कथा पडद्यावर साकारली जाणार आहे. या चित्रपटाची कहाणी भुज विमानतळाचा प्रभारी आयएएफ स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिक यांच्याभोवती फिरत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0