विश्रांतीनंतर पावसाची हजेरी : शेतीच्या कामांना वेग

11 Jul 2021 18:04:21

Kalyan _1  H x


टिटवाळा : सुरुवात दमदार करून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. रविवारी पावसाने रिमझिम बरसण्यास सुरुवात केल्याने भातशेती लागवडीच्या कामांनी जोर धरला. कल्याणच्या ग्रामीण भागात भातलागवडीची सुरुवात झाली आहे.
 
 
कल्याण तालुक्यातील मुख्य पीक म्हणजे भाताचे होय. परंतु पेरणी नंतर दहा दिवस पावसाने दडी मारल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. पावसाने घेतलेल्या उघडीपिमुळे शेतकरी राजा कमालीचा हवालदिल झाला होता. मात्र दोन दिवसांपासून काही प्रमाणात पडत असणारा पाऊस हा शेतीच्या लागवडीसाठी पूरक असल्यामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे. यामुळे शेतीची भात लागवडीचे काम करण्यासाठी शेतकरी राजा शेतात उतरला आहे.
 
 
जागोजागी भातलागवडीची कामे करत असणारा शेतकरी वर्ग दिसून येत आहे. पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. परंतु अजून जास्त पावसाची गरज असून जोराचा पाऊस शेतीला मिळाला तर भाताचे पीक चांगले येत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.



Powered By Sangraha 9.0