'त्या' सेकंदाला तिनं जग जिंकलं! मोदींनीही दिल्या शुभेच्छा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jul-2021
Total Views |

Modi _1  H x W:



मुंबई : भारत आणि इंग्लंड महिला क्रिेकेट संघांमध्ये झालेल्या पहिल्या T-20 सामन्यात  Harleen Deol हरलीन देओलने घेतलेल्या जबरदस्त झेलचे जगभरात कौतूक केले जातेय. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच चपळाईने केलेल्या तिच्या या कामगिरीबद्दलचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
 
या कामगिरीनंतर तिला सुपरवुमन म्हणून संबोधले जाऊ लागले आहे. झालं काय होतं की, हरलीननं इंग्लंडच्या एमी जोन्सला बाद करण्यासाठी झेल घेण्याचा प्रयत्न केला. एका क्षणाला एमीला धावा मिळतील की काय, अशी शंका त्या त्या क्षणाला पाहणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात येऊन गेली. पण हरनीलनं घेतलेला झेल काही काळासाठी उंच हवेत फेकला तोल सावरल्यानंतर पुन्हा मैदानात येऊन तो टीपला. बस्स हा क्षण प्रत्येक भारतीयांसाठी पुन्हा पुन्हा अनुभवावा, असा ठरला.
 
 
 
इंग्लंडची खेळाडू एमीचा खेळपट्टीवर त्यावेळी जम बसला होता. तिच्या जबरदस्त खेळीनं सर्व गोलंदाजांची दाणादाण उडाली होती. २७ चेंडूत तिने एकूण ४३ धावा ठोकल्या ज्यात चार चौकार आणि दोन षटकारही होते. अर्धशतकाकडे कूच करणाऱ्या एमीने एक उंच फटका मारला आणि सीमारेषेबाहेर चेंडू जातो की काय, असा तो क्षण होता. मात्र, सुपरवुमन हरलीन देओलने सहा धावा रोखल्याच शिवाय अप्रतिम झेल घेत एमीलाही तंबूत पाठवले.  Harleen Deol
 
 
क्रीडा, राजकारण मनोरंजन सर्वच क्षेत्रातून हरनीलवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने हा सर्वोत्तम झेल असल्याचे सांगितले. हरभजन सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण, सुरेश रैना आदींनी हरलीनचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनीही हरलीनने घेतलेल्या झेलचा व्हीडिओ शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या. अद्भुत, खूप सुंदर, अशी प्रतिक्रीया मोदींनी दिली. Harleen Deol best catch video 
 
 
कोण आहे हरलीन देओल ?
 
 
हरलीन कौर देओलचा जन्म २१ जून १९९८ मध्ये झाला. ती लेफ्ट हॅण्ड बॅट्समन आहेच, शिवाय लेग स्पीन गोलंदाजीही करते. तिने २२ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबईतील वानखेडेतून इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तानिया भाटीयानंतर ती भारताकडून खेळणारी चंडीगढची दुसरी महिला क्रिकेटर आहे. ४ मार्च २०१९ रोजी इंग्लंड विरुद्ध महिला T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून पदार्पण केले. Harleen Deol best catch video 




@@AUTHORINFO_V1@@