प्रसारमाध्यमातील एका गटावर मोदींचा निशाणा

    दिनांक  07-Jun-2021 20:00:16
|modi_1  H x W:


नवी दिल्ली: आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेतून निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य केले.

नरेंद्र मोदींनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. मोदी म्हणाले की, सुरुवातीला केंद्र सरकारने लसीकरण सूरु केले. त्यानंतर सगळे अधिकार, निर्णय केंद्र सरकारकडेच का ? संपूर्ण देशाला एकच नीती का लागू केली ? लसीकरणाचा वयोगट केंद्र सरकारच का ठरवणार ? राज्य सरकारांना अधिकार द्या , अशी मागणी केली गेली. त्यात मीडियातील एका गटाने याविषयी मोहीम चालवली अस नरेंद्र मोदी म्हणाले.

त्यानंतर मात्र राज्य सरकारांच्या अडचणी लक्षात आल्या. काही राज्य सरकारांनी हे खुल्या दिलाने मान्य केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.