भज्जीने खलिस्तानी दहशतवाद्याला म्हंटल शहीद ; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

    दिनांक  07-Jun-2021 16:00:26
|

Harbhajan Singh_1 &n
 
 
नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३७व्या वर्षानिमित्त भज्जीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली. यात त्याने सुवर्ण मंदिरात ठार झालेल्या खलिस्तानी जनरल भिंद्रनवालेला अप्रत्यक्षपणे श्रद्धांजली वाहिली आहे. या पोस्टमध्ये त्याचे नाव घेतले नसले तरीही ट्विटरवर मात्र भज्जीवर चांगलीच टीका होत आहे. भज्जीने जरनल भिंद्रनवालेला शहीद असल्याचं आपल्या स्टोरीतून दाखवल्यामुळे सोशल मिडीयावर नेटकऱ्यांचा राग अनावर झाला.
 
 
'अभिमानाने जगा आणि धर्मासाठी मरा' असे इंस्टाग्राम स्टोरीमध्ये भज्जीने स्टेटस ठेवले आहे. भज्जीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये जरनल भिंद्रनवालेचा निळ्या पगडीतील फोटो पोस्ट केला आहे. ऑपरेशन ब्लू स्टारच्या ३७ व्या वर्धापनदिनानिम्मित भज्जीने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. १ जून ते ८ जून १९८४दरम्यान अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टार करण्यात आले. भारतीय सैन्याने केलेले ही एक मोठी मोहिम होती.
 
 
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ऑपरेशनला परवानगी दिली होती. पंजाबमधील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था यंत्रणा सुधारण्यासाठी हे ऑपरेशन चालविण्यात आले होते. या कारवाईचा एक भाग म्हणून, शीख समुदायासाठी राज्य निर्माण करू इच्छिणाऱ्या भिंडरांवालेच्या नेतृत्वातील दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सैन्याने १९८४मध्ये सुवर्ण मंदिरात प्रवेश केला.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.