त्रिपुरामध्ये नव्या गुंतवणूकदारांना प्रचंड संधी – प्रशांत गोयल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jun-2021
Total Views |
tp_1  H x W: 0


‘पार्क’तर्फे विशेष संवादाचे आयोजन
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : त्रिपुरामध्ये गेल्या ३ वर्षांत उद्योगस्नेही वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे ईशान्य भारतातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र बनण्याची क्षमताही त्रिपुरामध्ये आहे. त्यामुळे देशातील नव्या गुंतवणूकदारांना राज्यात गुंतवणूक करण्याची प्रचंड मोठी संधी आहे, असे मत त्रिपुराचे उद्योग आणि वाणिज्य खात्याचे प्रधान सचिव प्रशांत गोयल यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
 
 
 
पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर अर्थात ‘पार्क’तर्फ आयोजित इन्व्हेस्ट फॉर ग्रोथ इन इंडिया – पोटेन्शिअल मल्टी सेक्टरल ऑपॉर्च्युनिटीज इन त्रिपुरा या विशेष व्हर्चुअल संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्रिपुराच्या उद्योग आणि वाणिज्य खात्याच्या सचिव स्वप्ना देबनाथ, पार्कचे कार्यकारी संचालक विक्रम शंकरनारायणन आणि महाराष्ट्र तसेच देशाच्या विविध भागातील उद्योजक – गुंवतणूकदार उपस्थित होते.
 
 
 
प्रधान सचिव प्रशांत गोयल यांनी त्रिपुरामध्ये उद्योगस्नेही वातावरण निर्माण झाल्याचे यावेळी सांगितले. ते म्हणाले, त्रिपुराचे भौगोलिक स्थान आणि हवामान हे प्रामुख्याने रबर, बांबू, अन्नप्रक्रिया, फळे या उद्योगांसाठी अनुकूल आहे. राज्यात रबराचे मुबलक प्रमाणात उत्पादन होते, त्यामुळे वाहननिर्मिती क्षेत्राचा महत्वाचा भाग असलेल्या टायर निर्मितीमध्ये त्रिपुरा मोठे योगदान देऊ शकते. त्याचप्रमाणे अननस हे राज्याचे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगांतर्गत कॅनिंग, ज्यूस यामध्ये भरीव काम करता येणे शक्य आहे. तसेच पर्यटन, टी टुरिझम यातही त्रिपुरात गुंतवणूकीस मोठी संधी उपलब्ध आहे, असेही गोयल यांनी सांगितले.
 
 
 
 
pg_1  H x W: 0
 
प्रशांत गोयल -  प्रधान सचिव, उद्योग व वाणिज्य विभाग, त्रिपुरा
 
 
 
त्रिपुरा रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाने देशातील प्रमुख महानगरांशी जोडले गेले आहेत. बांग्लादेशातील चितगाव बंदर केवळ ७५ किमी अंतरावर आहे. त्याचप्रमाणे इज ऑफ डुईंग बिझनेसमध्येही त्रिपुरा अग्रेसर असून स्वस्त आणि मुबलक विज, सरकारी अनुदानदेखील देण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात ईशान्य भारतातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र बनण्याची क्षमता असल्याचेही गोयल यांनी यावेळी नमूद केले.
 
 
 
त्रिपुरासह ईशान्य भारताच्या आर्थिक विकासास गती देणे हे पार्कचे लक्ष्य असल्याचे विक्रम शंकरनारायणन यांनी सांगितले. ते म्हणाले, त्रिपुरामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक करणे शक्य आहे. भारत – बांग्लादेश मैत्री सेतूमुळेही ईशान्य भारताच्या विकासास गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
 
यावेळी बडवे उद्योगसमुहाचे अध्यक्ष श्रीकांत बडवे, कार्यकारी संचालिका सुप्रिया बडवे, श्रीपाद जावळेकर, औषधनिर्माण व बायोटेक क्षेत्रातील ईश्वर रेड्डी, महिको समुहाचे सुब्बाराव, एव्हिएशन क्षेत्रातील नितीन देशपांडे, पॅरिस येथील खोदादाद मोराडीयन यांच्यासह अन्य उद्योजक उपस्थित होते.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@