ऋतिक रोशनने पुन्हा एकदा सिंटासाठी पुढे केला मदतीचा हात!

    दिनांक  04-Jun-2021 13:01:52
|

Hritik Roshan_1 &nbs
 
मुंबई : ऋतिक रोशनने पुन्हा एकदा सिने एंड टीवी आर्टिस्ट्स एसोसिएशन (सिंटा) सदस्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. ऋतिकने असोसिएशनला २० लाख रुपयांची देणगी दिली असून दारिद्र्य रेषेखालील सदस्यांसाठी रेशन किट देखील प्रदान करणार आहे. या मदतीचा फायदा सिंटाच्या ५ हजार सदस्यांना होणार आहे. या पुढकराविषयी सिंटाचे महासचिव अमित बहल यांनी ऋतिक रोशनचे आभार मानले.
 
 
अमित बहल यांनी सांगितले की, "ऋतिक रोशनने मागच्या लॉकडाउनच्या वेळेस देखील आमची मदत केली होती. या वेळी, त्यांनी केलेल्या मदतीतून असोसिएशनच्या ५००० सदस्यांचे लसीकरण करण्यात येणार असून दारिद्र रेषेखालील सभासदांना रेशन किट पुरवण्यात येणार आहे."
 
अभिनेता या संकटकाळात लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचा कायम प्रयत्न करत आहे. कोविड -१९च्या पहिल्या लाटेत देखील, ऋतिकने सिंटा (CINTAA) साठी २५ लाखाची आर्थिक मदत केली होती, ज्यातून ४ हजार दैनंदिन कारागिरांना आणि त्यांच्या कुटुंबांना मदत करण्यात आली होती. मुंबई पोलिसांसाठी हँड सॅनिटाइजर्सपासून फ्रंट लाइन वॉरिअर्सच्या आरोग्य सुरक्षेमध्ये योगदान देण्याबरोबरच कोविड -१९ रुग्णांसाठी ऑक्सीजन सिलेंडर आणि कंसेंट्रेटर्सपर्यंत, ऋतिक अनेक गरजू लोकांची सक्रियपणे मदत करत आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.