‘मुंबई सागा’मधील ‘ते’ दृश्य ‘सेन्सॉर’कडून ब्लर

30 Jun 2021 12:49:00

mumbai saga_1  


माफी मागेपर्यंत खटला मागे घेणार नाही : अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर



मुंबई : ‘अ‍ॅमेझोन प्राईम’वरील ‘मुंबई सागा’ या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर करण्यात आलेले खोडसाळ तसेच मानहानीकारक चित्रण व संवादाला ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (सेन्सॉर)कडून चित्रपट निर्मात्यांच्या विनंतीवरून अस्पष्ट (ब्लर) करण्यात आले आहे. “या सिनेमाची निर्मिती केलेल्या ‘सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’, ‘व्हाईट फिदर लिमिटेड’ने आपली चूक मान्य करून चित्रपटातील ‘ते’ दृश्य ‘सेन्सॉर’कडून आणि ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’च्या माध्यमातून जरी अस्पष्ट करून घेतले असले, तरीही त्यांनी अजून जाहीर माफी मागितलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावरील खटला आपण मागे घेणार नाही,” असे अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर यांनी स्पष्ट केले आहे.


या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या प्रसंगामुळे संघ स्वयंसेवक यांची मानहानी होत असून, यामुळे संघ व स्वयंसेवकांबाबत चुकीचा संदेश समाजात जात असल्याने रा. स्व. संघाचे मुंबईतील स्वयंसेवक महेश भिंगार्डे यांनी, संघाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणार्‍या या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती. “चित्रपटातील संबंधित प्रसंग, संवाद त्या चित्रपटातून काढून टाकावेत व बिनशर्त माफीही मागितली जावी,” अशी मागणीही त्यांनी या नोटिसीत केली होती.



 


 
Powered By Sangraha 9.0