राज्य सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत राज्यातही बारावीच्या परीक्षा रद्द?

03 Jun 2021 13:37:52

CBSE BOARD_1  H
 
मुंबई :‘सीबीएसई’पाठोपाठ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. तसा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे. अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. “बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिलला होणार होती. नंतर आपण ती पुढे ढकलली. केंद्राने ‘सीबीएसई’च्या परीक्षा नुकत्याच रद्द केल्या. राज्य सरकारनेही याबाबत विचारणा केली होती. आम्ही मंत्रिमंडळाला इतर राज्यांची माहिती दिली.
 
 
त्यानुसार आम्ही बारावी परीक्षा निर्णयाची फाईल आपत्ती विभागाला सोपवत आहोत. ही एक असाधारण परिस्थिती असल्याने आपत्ती विभाग निर्णय घेईल लवकरच त्यांची बैठक होईल आणि ते निर्णय घेतील. त्यानंतर आम्ही बारावी परीक्षा निर्णयाबाबत कळवू. मुलांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत आम्ही जी भूमिका मांडली होती. ती भूमिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सरकार बाजू मांडेल. सरकार उद्या होणार्‍या सुनावणीत बाजू मांडेल,” असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.
Powered By Sangraha 9.0