भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल ; राहुलने केला फोटो शेअर

    दिनांक  03-Jun-2021 17:21:06
|

Team India_1  H
 

मुंबई : तब्बल चार महिन्यांच्या मोठ्या दौऱ्यासाठी भारतीय संघ हा गुरुवारी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. पुरुष संघासोबतच महिला संघदेखील इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केएल राहुलने इंग्लंडच्या भूमीवर पोहोचल्यानंतर विमानतळावरील एक फोटो इस्टाग्रामवर शेअर केला. भारतीय पुरुष क्रिकेट संघ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.
 
 
तर, इंग्लंडविरुद्धही कसोटी मालिका खेळणार आहेत. तसेच, भारतीय महिला क्रिकेट संघ हा १ कसोटी, ३ एकदिवसीय आणि ३ टी - २० सामने खेळणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ १८ जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळणार आहे. हा सामना साऊथम्पटनमध्ये होणार आहे. त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ ऑगस्टपासून ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. इंग्लंड पोहोचल्यानंतर भारतीय संघ क्वारंटाईन झाला आहे. तसेच, इंग्लंडला रवाना होण्याआधीही भारतीय संघ मुंबईमध्ये क्वारंटाईन होती.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.