त्रिपुराच्या आर्थिक विकासासाठी महाराष्ट्रातील ‘पार्क’चा पुढाकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jun-2021
Total Views |

parc_1  H x W:


त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, उद्या उद्योग सचिवांसोबत संवाद
 
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : ईशान्य भारतातील त्रिपुरा या राज्यात अन्न प्रक्रिया, रबर, बांबू यासह अन्य क्षेत्रांच्या विकासासाठी विवेक व्यासपीठ संचलित पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर अर्थात ‘पार्क’ने पुढाकार घेतला आहे. ‘पार्क’तर्फे त्रिपुरामध्ये गुंतवणूकदारांना संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
 
 
त्रिपुरा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर विविध उद्योगही तेथे केले जातात. मात्र, या उद्योगांचा विस्तार करणे, त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि यंत्रसामुग्रीचा वापर करणे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे देशातील गुंतवणूकदारांनी त्यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी विवेक व्यासपीठ संचलित पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर अर्थात ‘पार्क’ने गेल्या महिन्यात त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देब यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली होती.
 
 
 
 
par_1  H x W: 0
 
 
 
 
त्या चर्चेमध्ये त्रिपुरामध्ये अन्न प्रक्रिया, रबर, बांबू, पर्यटन, हॉर्टीकल्चर, टी टुरिझम, वराह आणि कुक्कुटपालन आदी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ‘पार्क’ने या सर्व क्षेत्रांचा अभ्यास करून त्रिपुरामध्ये गुंतवणूक कशी वाढविता येईल, यासाठी सविस्तर अहवालही तयार केला आहे. त्याचप्रमाणे देशातील विविध भागांतील गुंतवणूकदारांना त्रिपुरामध्ये संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्रिपुराच्या उद्योग आणि वाणिज्य खात्याचे प्रधान सचिव प्रकाश गोयल यांच्यासोबत व्हर्चुअल संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी देशाच्या विविध भागांमधील उद्योजक आणि गुंतवणूकदार सहभागी होणार आहे. ‘पार्क’च्या फेसबुक पेजवर ही चर्चा पाहता येणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@