खडसे, सामंत आणि शरद पवारांमध्ये चर्चा

    03-Jun-2021
Total Views |

sharad pawar_1  
 
 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवार, दि. 2 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी ही भेट झाली. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या शरद पवारां सोबतच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
 
 
दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली होती. या दहा मिनिटांच्या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मंगळवार, दि. 1 जून रोजी जळगाव दौर्‍यावर होते. यावेळी मुक्ताईनगर येथे खडसेंच्या निवासस्थानी त्यांनी खा. रक्षा खडसे व एकनाथ खडसे यांची भेट दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे आज शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या झालेल्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, शरद पवार यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही घेतलेली सदिच्छा भेट असल्याचे एकनाथ खडसे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.