लाल किल्ल्यावरील हिंसाचाराप्रकरणीआणखी एका आरोपीला पकडण्यात यश

29 Jun 2021 12:23:09

gurjyot singh_1 &nbs
नवी दिल्ली : लाल किल्ल्यावरील हिंसाचारप्रकरणी एक लाख रुपयांचे बक्षीस असणार्‍या आणखी एका आरोपीस जेरबंद करण्यात तपास यंत्रणांना अखेर यश आले आहे.गुरज्योत सिंग (२१) असे आरोपीचे नाव असून पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवार, दि. २८ जून रोजी पहाटे अमृतसर येथून त्याला अटक केली होती.



गुरज्योत सिंगची माहिती देणार्‍या व्यक्तीला २१ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनी शेतकर्‍यांच्या ‘ट्रॅक्टर रॅली’दरम्यान राजधानी दिल्लीत मोठा हिंसाचार भडकला होता. हा हिंसाचार भडकविण्यासाठी कारणीभूत असणार्‍यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांपैकी गुरज्योत हादेखील एक होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो फरार होता. गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणा त्याच्या मार्गावर होती. अखेरीस त्याची माहिती देणार्‍यास पोलिसांकडून २१ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. तो अमृतसर येथे असल्याचा सुगावा लागताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

Powered By Sangraha 9.0