नवे गडी नवे राज्य ! नव्या दमाची टीम इंडिया विजयी होणार का?

29 Jun 2021 18:22:31

Team India_1  H
 
मुंबई : विराट कोहलीच्या नेतृत्वामध्ये भारतीय कसोटी संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद मिळवण्यास अपयशी ठरले. आता भारतीय क्रिकेटपटूंचे लक्ष लागले आहे ते शिखर धवनच्या भारतीय संघाच्या कामगिरीकडे. शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ नुकताच श्रीलंकेत दाखल झाला. काही दिवस हा संघ मुंबईत क्वारंटाईन राहिल्यानंतर सोमवारी सकाळी ते श्रीलंकेमध्ये दाखल झाले.
 
 
२९ जून ते १ जुलै या कालावधीत ते हॉटेलमध्ये क्वारंटाईन असणार आहेत. त्यानंतर २ ते ४ जुलै या कालावधीत त्यांना टप्प्याटप्प्याने सराव करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. तर ५ जुलैपासून ते एकत्र सराव करण्यास सुरुवात करणार आहेत. भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला १३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये तीन एकदिवसीय व तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.
 
राहुल द्रविडची कसोटी
 
 
 
पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड हा भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सांभाळणार आहे. याआधी त्याने १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपाद सांभाळले होते. त्यामुळे आता त्याच्याकडूनही भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा वाढल्या आहेत. शिखर धवन आणि राहुल द्रविडच्या या जोडीमुळे तसेच सर्व युवा खेळाडूंची साथ असलेल्या या संघाकडून श्रीलंका दौऱ्यावर चांगली कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0