ड्रोन प्रकरणानंतर पंतप्रधानांची उच्चस्तरीय बैठक

29 Jun 2021 20:06:36

pmo_1  H x W: 0


नवी दिल्ली:
जम्मू येथील भारतीय हवाईदलाच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीस देशाचे गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल उपस्थित होते.


जम्मू येथील भारतीय हवाईदलाच्या तळावर शनिवार आणि रविवारच्या रात्री सलग दोन दिवस ड्रोन हल्ल्याची घटना घडली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने सदर प्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला आहे.त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७, लोककल्याण मार्ग या अधिकृत निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि एनएसएस अजित डोवाल उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधानांनी सुरक्षेसंदर्भात विविध विषयांचा आढावा घेतल्याचे समजते. त्याचप्रमाणे भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्र, भविष्यातील गरज आणि तंत्रज्ञान आदी विषयांवरही पंतप्रधानांनी माहिती घेतल्याचे समजते.
Powered By Sangraha 9.0