'म' मराठीचा... मराठीतला पहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Jun-2021
Total Views |

OTT_1  H x W: 0
 
मुंबई : मराठी भाषेसाठी आता स्वतःचे असे हक्काचे ओटीटी प्लॅटफॉर्म उभे राहिले आहे. नुकतेच 'प्लॅनेट मराठी ओटीटी' या अॅपचे लाँच झाले असून ३० जूनला या प्लॅटफॉर्मवर 'जून' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री यांच्या उपस्थितीत हा ऑनलाइन लाँच सोहळा मुंबईच्या 'प्लॅनेट मराठी'च्या कार्यालयात पार पडला. त्यांची वेबसाईट आणि गुगल अॅप स्टोअरवर हे अॅप डाऊनलोड करण्यास उपलब्ध झाले आहे.
 
 
 
 
 
 
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म म्हणजे फेसबुक तसेच इंस्टाग्रामवर याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी प्लॅनेट मराठीचे प्रमुख आणि संस्थापक अक्षय बरदापूरकर, तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष अमित भंडारी आणि सोशल मिडिया प्रमुख जयंती वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक ओरीजनल मराठी वेब सिरीज्स आणि काही चित्रपट या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील.
 
 
३० जून रोजी या प्लॅटफॉर्मवर 'जून' हा चित्रपट प्रक्षेपित होणार आहे. सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटामध्ये नेहा पेंडसे आणि सिद्धार्थ मेनन अशी नवी जोडी पाहायला मिळणार आहे. याशिवाय किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
 
'जून'बद्दल 'प्लँनेट मराठी ओटीटी'चे मुख्य अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले की, ''प्रादेशिक भाषेमध्ये अनेक वेगवेगळे विषय हाताळले जातात. असाच एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न 'जून'मध्ये करण्यात आला आहे. जो नेहमीपेक्षा वेगळा आहे आणि म्हणूनच 'जून 'ची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही घेण्यात आली आहे. 'जून' मधून प्रेक्षकांना नक्कीच एक सकारत्मक दृष्टीकोन मिळेल."
 
 
नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, डिस्ने हॉटस्टार आणि सोनी लाईव्हसारख्या इंटरनॅशनल ओटीटी प्लॅटफॉर्मसमोर आता हा मराठी प्लॅटफॉर्म कशी टक्कर देतो. तसेच, मराठी प्रेक्षकांचा याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, मराठी भाषेला एक वेगळा ओटीटी प्लॅटफॉर्म मिळत असल्याने मराठी अभिनय क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@