प्रदीप शर्मांच्या कोठडीत वाढ

29 Jun 2021 12:26:06

pradeep shama_1 &nbs


मुंबई : ‘अ‍ॅन्टिलिया’ येथील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणी अटकेत असलेले प्रदीप शर्मा, संतोष शेलार आणि आनंद जाधव या तिघांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. या तिघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी प्रदीप शर्मा याने त्याला विशेष कारागृहात पाठवण्यात यावे, अशी मागणी न्यायालयात केली. तळोजा कारागृहातील प्रशासनाने शर्माच्या अर्जाची योग्य ती दखल घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0