येत्या ३ दिवसात वारीचा निर्णय घ्या नाहीतर मोठ्या परिणामांना सामोरे जा:आचार्य भोसले

27 Jun 2021 15:44:25

uddhav thacte_1 &nbs
मुंबई : यंदा पायी वारी रद्द करत, वारीला मोजक्याच संख्येत एसटीद्वारे वारकर्यांना वारीला जाण्याची सोय सरकारने केली आहे.तसेच दहा मनाच्या पालख्यांना परवानगी दिली आहे.त्याच्यावरून वारकरी संप्रदाय नाराज आहे.राज्यात अनेक ठिकाणी नेत्यांचा सभाना व आंदोलनाला गर्दी चालते मात्र वारकऱ्यांना वारी साठी परवानगी नाही दिली,त्यामुळे वारकरी आणि भाजप अध्यात्मिक आघाडी आक्रमक झाकी आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीने ३ दिवसात निर्णय घ्या अन्यथा परिणामांना सामोरं जा म्हणत सरकारला ईशारा दिला आहे.


धर्मरक्षक राज्यपालांच्या स्पष्ट सूचनेनंतरही मुख्यमंत्र्यांनी आडमुठी भूमिका घेतली. कारण हिंदुत्व विरोधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली बाळासाहेबांच्या वाघाची मांजर झाली. एकवेळ महाराष्ट्राची शेकडो वर्षाची पायी वारीची परंपरा खंडीत झाली तर चालेल पण इटालियन हिंदू विरोधी अजेंडा टिकला पाहीजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका सगळा महाराष्ट्र पाहतोय. अजूनही वेळ गेलेली नसून येत्या ३ दिवसात पायी वारीचा निर्णय घ्या नाहीतर उद्भवणाऱ्या मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल. वारकर्यांचा निर्णय ठरलेला आहे, त्याची मोठी किंमत या सरकारला मोजावी लागेल असं भाजप अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष तुषार आचार्य भोसले यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0