आदित्य ते अब्दुल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2021   
Total Views |

p_1  H x W: 0 x

कानपूरचा ‘आदित्य गुप्ता’ काही रातोरात ‘अब्दुल कादिर’ झाला नाही. शालेय जीवनापासूनच त्याच्या ब्रेनवॉशिंगचा पडद्यामागे प्रयत्न सुरू होता. उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच उघडकीस आलेल्या धर्मांतर कांडातील बळी ठरलेल्यांपैकी मूक-बधीर असलेला आदित्य उर्फ अब्दुल. या प्रकरणातील चौकशीतून आदित्यचा अब्दुलपर्यंतचा प्रवास कसा झाला, ते सांकेतिक भाषा तज्ज्ञांच्या माध्यमातून पोलीस चौकशीअंती समोर आले आहे आणि जी माहिती आदित्यकडून मिळाली ती केवळ धक्कादायकच नसून, तर या प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याची यावरून कल्पना यावी.
आदित्यला या टोळीतर्फे इस्लामिक साहित्य आणि त्यासंबंधीचे व्हिडिओज वारंवार शेअर केले गेले. नोकरी, पैसा आणि लग्नाचेही त्याला आमिष दाखविले. एवढेच नाही, तर दोन हजार रुपये हातावर टेकवून त्याचा खतनाही करून टाकला. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की, आदित्य १० मार्चपासून बेपत्ता होता आणि तशी तक्रारही पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. पण, नंतर तो स्वत:हूनच घरी परतला. पण, आता आदित्य आदित्य राहिला नव्हता, तर तो मनाने आणि कागदोपत्रीही अब्दुल झाला होता.
चौकशीदरम्यानही आपण काही गैर केले किंवा आपल्याकडून कुणी काही चुकीचे करवून घेतले याचा आदित्यला ना पश्चाताप ना खंत. उलट अल्लासाठी मी जीवही द्यायला आता तयार आहे, इथवर या तरुणाची मानसिकता या धर्मांधांनी विषारी आणि विखारी करून टाकली. हे प्रकरण जरी आता उघडकीस आले असले, तरी या गेल्या तीन-चार वर्षांतील ब्रेनवॉशिंगचा परिपाक म्हणावा लागेल. विशेष म्हणजे, आदित्यची आई स्वत: शिक्षिका होती. पण, आपला मुलगा सकाळी निघाल्यानंतर दिवसभर कुठे जायचा, कुणाला भेटायचा, याची कुठलीही माहिती तिला नव्हती. एवढेच नाही तर आदित्यच्या शाळेतील मुख्याध्यापिकेने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वर्तन इतर मुलांपेक्षा निश्चितच वेगळे होते. मजार समोर येताच तो नतमस्तक व्हायचा, शुक्रवारी जेवणानंतर नमाजींसारखा बसायचा. पण, या सगळ्या गोष्टींचा आदित्यच्या मूक-बधीरपणामुळे कुणाला संशयही आला नसावा. उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू असून, अशा मूक-बधिरांना मुद्दाम हेरून त्यांचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी करायचा मोठा संशयही व्यक्त केला जात आहे. आगामी काळात त्याचाही उलगडा होईलच.
चिदंबरम, चोरी अन् चमत्कार!
दि. २१ जून रोजी एकाच दिवशी तब्बल ८५ लाख लोकांचे लसीकरण करून भारताने कोरोनाविरोधी लढ्यातील आपली ताकद आणि क्षमता याचे जागतिक दर्शन घडविले. एकीकडे जगभरातून या लसीकरण मोहिमेवर कौतुकवर्षाव होत असताना, काही देशांनी तर ‘कोविन’ पोर्टलसारखे पोर्टल त्यांच्या देशात विकसित करायची इच्छाही बोलून दाखविली. पण, काँग्रेसला नेहमीप्रमाणे भारताच्या या यशस्वी वाटचालीतही काळेबेरेच दिसले. जेव्हा-जेव्हा मोदी सरकारच्या नेतृत्वात काही चांगले, देशहिताचे घडते, तेव्हा-तेव्हा काँग्रेसला कसा पोटशूळ उठतो, हे अवघ्या देशाने गेल्या सात वर्षांत प्रकर्षाने पाहिले आणि अनुभवले. मग तो विषय ‘राफेल’चा असो, पाकिस्तानवरील ‘एअर स्ट्राईक’चा, ‘नोटाबंदी’चा किंवा श्रीरामजन्मभूमीचा ऐतिहासिक निर्णय. प्रत्येक वेळी काँग्रेसने ‘हात’ दाखवून अवलक्षण करण्याची आपली परंपरा अगदी नेटाने कायम राखली. आताही विक्रमी लसीकरणानंतर आनंद व्यक्त करण्याऐवजी काँग्रेसच्या राजकीय कोतेपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. संपुआच्या काळात या देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्रिपद भूषविलेले पी. चिदंबरम यांनी ट्विट करत विक्रमी लसीकरणाची खिल्ली उडविली. चिदंबरम हिंदीत म्हणतात, “रविवार को जमाखोरी, सोमवार को टीका लगाएं और मंगलवार को लंगड़ाकर वापस लौट जाएं। एक दिन के टीकाकरण के विश्व रिकॉर्ड के पीछे यही रहस्य हैं। मुझे यकीन हैं की, इस करतब को ‘गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड्स’ में जगह मिलेगी। कौन जाने, हो सकता हैं मेडिसिन का ‘नोबेल’ पुरस्कार मोदी सरकार को दिया जाए। ‘मोदी हैं, मुमकिन हैं’ को अब पढ़ना चाहिए ‘मोदी हैं, चमत्कार हैं।” ही चिदंबरमवाणी हिंदीत उद्धृत करण्याचे कारण की, त्यासाठी हिंदीतच असलेली एक म्हण - ‘चोर के दाढी मे तिनका।’ संपुआच्या काळातील कोट्यवधींच्या महाघोटाळ्यांमागील चोराला चोरी कशी करायची ते अगदी नेमके ठाऊक! म्हणूनच, या लसीकरणातही कशी चोरी करता येईल, याचा हा चमत्कारिक फॉर्म्युला चिदंबरम मांडून मोकळे झाले. चिदंबरम पिता-पुत्रांनी ‘आयएनएक्स मीडिया’ घोटाळ्यातही असाच ‘चमत्कार’ केला होता. ‘कोळसा’, ‘टू-जी स्पेक्ट्रम’, ‘सत्यम’, ‘आदर्श’ आणि असे किती तरी घोटाळे हे चिदंबरम काळातलेच. तेव्हा, मुळात कावीळ झालेल्याला ज्याप्रमाणे अख्खं जगच जसं पिवळं दिसतं, त्याप्रमाणे सराईत चोरांनाही असे ‘चमत्कार’ हे चोरधंदे वाटतात, त्याचे नवल ते काय?
@@AUTHORINFO_V1@@