डेल्टा प्लस वायरसचा देशभरात प्रसार ; ४ राज्यात ४० प्रकरणे

23 Jun 2021 12:12:20

delta plus_1  H
 

महाराष्ट्रात १६ नमुने आढळल्याने राज्यात वाढली चिंता

 
 
 
मुंबई : एकीकडे कोरोनाचा प्रसार कमी होताना दिसत असताना दुसरीकडे कोरोनाचाच डेल्टा प्लस वायरसचा प्रसार होत असल्याची बाब समोर आली आहे. यासाठी आता केंद्र सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून देशभरात ४ राज्यांमध्ये या वायरसची लागण झालेले अंदाजे ४० रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात या वायरसचे २० नमुने आढळून आले आहेत. यामुळे राज्यात आणखी चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ कंसर्न (चिंताजनक) म्हटले आहे.
 
 
 
भारतासह नऊ देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशात २२ प्रकरणे आढळली आहेत. तसेच, डेल्टा प्लस व्हेरिएंटवर लक्ष ठेवून असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंटची सर्व माहिती जमा केली जात आहे. तसेच, डेल्टा प्लस व्हेरिएंटवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन प्रभावी आहेत, असे आढळून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात डेल्टा प्लस प्रकरणामधील २२ प्रकारणांपैकी १६ प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत. उर्वरित प्रकरणे केरळ आणि मध्य प्रदेशात आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0