हुश्श ! आजपासुन ठाण्यात १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण

22 Jun 2021 19:36:29

Thane_1  H x W:
 
 
ठाणे : लसीच्या अपुर्‍या साठ्यामुळे मागील सुमारे दीड महिन्यापासुन ठाण्यात १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण बंद होते.आता ठाणे महापालिकेच्यावतीने ४५ लसीकरण केंद्रावर १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण बुधवारी २३ जूनपासून सुरु करण्यात येणार आहे.यासाठी १० हजार लसीचे डोस देण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
 
 
 
ठाणे महापालिकेच्यावतीने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे 'वॉक इन' आणि ऑनलाईन नोंदणी पद्धतीने १९ जून पासून लसीकरण सुरु करण्यात आले.लसीच्या अपुऱ्या साठयामुळे १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण १२ मे पासुन बंद कऱण्यात आले होते.परंतु आता राज्य सरकारच्या निर्देशांनुसार २३ जूनपासून पालिकेच्या ४५ केंद्रावर लसीकरण सुरु करण्यात येत आहे. दरम्यान दर मंगळवार आणि शनिवार या दोनच दिवशी सर्वच लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
 
 
१८ वर्षावरील तरुणांची गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपली असून लसीकरणाचे नियोजन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.बुधवारपासून महापालिकेच्या ४५ लसीकरण केंद्रावर लस देणे सुरु होणार आहे.शिक्षण,नोकरी तसेच व्यवसाय यानिमित्त तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून जास्तीत जास्त तरुणांनी या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा.
 
 
 
– डॉ. विपिन शर्मा,ठाणे महापालिका आयुक्त
 
 
Powered By Sangraha 9.0