विश्वास पाठक यांची भाजप प्रदेशाच्या आर्थिक, उद्योग आणि व्यापार प्रकोष्ठांच्या प्रभारीपदी नियुक्ती

21 Jun 2021 19:54:04

vishwas pathak_1 &nb




मुंबई : भाजप प्रदेशतर्फे विश्वास पाठक यांची आर्थिक, उद्योग आणि व्यापार या प्रकोष्ठांचे प्रभारी आणि प्रदेश प्रवक्ते (उर्जा व अर्थविषयक) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यातर्फे ही घोषणा करण्यात आली आहे. पाठक यांनी यापूर्वी २०१४ व २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी पक्षाच्या व्हिजन डॉक्युमेंटचे अध्यक्षपद, फडणवीस सरकारच्या कार्यकाळात ऊर्जा खात्यातील सर्व कंपन्यांमध्ये संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली होती. तसेच प्रदेश प्रवक्ता, प्रदेश माध्यम प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
 
 
 
चंद्रकांतदादा म्हणाले, "भाजप महाराष्ट्रतर्फे आपली प्रदेश प्रवक्ते (उर्जा व अर्थविषयक) म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच आपण भाजपच्या प्रसिद्धी विभागाचे केलेले कार्य उल्लेखनीय आहे. गेली अनेक वर्षे आपण आपल्या पदाच्या जबाबदाऱ्या घेऊन पक्षसंघटनेच्या वाढीसाठी कार्यरत आहात. आपला प्रदीर्घ अनुभव पाहता, उद्योग आघाडी व आर्थिक आघाडीचे प्रदेश प्रभारी म्हणून आपली नियुक्ती करत आहे."
 
 
पाठक यांनी पक्ष संघटनेसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, "भाजप प्रदेशाच्या आर्थीक, उद्योग आणि व्यापार या प्रकोष्ठांचे प्रभारी आणि प्रदेश प्रवक्ता म्हणून माझी नियुक्ती केल्याबद्दल आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे मी आभार मानतो."
 
 
 
"२०१४ व २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मला पक्षाच्या व्हिजन डॉक्युमेंटचा अध्यक्ष, फडणवीस सरकारमध्ये ऊर्जा खात्यातील सर्व कंपन्यांमधे संचालक, प्रदेश प्रवक्ता, प्रदेश माध्यम प्रमुख अश्या विविध जवाबदाऱ्या पार पाडत आता वरील नवीन जवाबदारीबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे.", असेही ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0