'जगमे थंडीरम'च्या ट्रेलरला तुफान प्रतिसाद ; सोशल मिडियावर चर्चा

    दिनांक  02-Jun-2021 15:05:32
|

Dhanush_1  H x

मुंबई : अभिनेता धनुषचा बहुचर्चित आगामी चित्रपट ‘जगमे थंडीरम’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरची जोरदार चर्चा सध्या सोशल मिडीयावर केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी धनुषच्या असुरणला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. तसेच, त्याचा 'कर्णन' हा चित्रपटदेखील गाजतो आहे. अशामध्ये त्याच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा होती. अशातच आता 'जगमे थंडीरम'च्या ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
 
 
या ट्रेलरवरून आंतरराष्ट्रीय दर्जाचे कथानक असून कथेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यात अभिनेता धनुष लंडनच्या रस्त्यावर मोठ्या गुंडांशी दोन हात करताना दिसत आहे. सुपरस्टार धनुषचा ‘कर्णन’ हा चित्रपट गेल्या महिन्यात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. परंतु देशातील कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे हा चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. पण गेल्या आठवड्यात हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपटाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतले.
 
 
धनुषचा ‘जगमे थंडीरम’ हा चित्रपट येत्या १८ जून रोजी प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात धनुष व्यतिरिक्त अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मी जेम्स आणि अभिनेता जोजू जॉर्ज सारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत संतोष नारायण यांनी दिले आहे. धनुषचा चाहता वर्ग या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.