पाक खेळाडू बाबर आझम पुन्हा चर्चेत ; बांधणार स्वत:च्या बहिणीशी लग्नगाठ

    दिनांक  02-Jun-2021 16:38:52
|

Babar Azam_1  H
 
मुंबई : अनेकवेळा पाकिस्तानी क्रिकेट वक्तव्य आणि पीसीबीच्या निर्णयांमुळे चर्चेत असतात. पाकिस्तानचे क्रिकेटपटू अनेकवेळा चर्चेत असतात. नुकतेच, पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने विराट कोहलीला मागे टाकत आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. सध्या तो एका वेगळ्याच बातमीमुळे प्रकाशझोतात आला आहे. त्याने चुलत बहिणीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मिडियावर याचीच चर्चा होत आहे.
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नुकताच दोघांचा साखरपुडा झाला आहे. पुढील वर्षी दोघे विवाहबंधनात अडकतील असे सांगण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे काही दिवसापुर्वी एका महिलेने बाबर आझमवर लैंगिक शोषण करण्याचा आरोप लावला होता. त्या महिलेने दावा केला होता की,’तिला बाबर आझमने लग्नाचे वचन दिले होते. आणि यादरम्यान १० वर्षे त्याने तिचे लैंगिक शोषण केले’ असा आरोप त्या महिलने केला होता. ती महिला गरोदर असताना बाबरने मित्रासोबत तिचा गर्भपात केला असा आरोप बाबर आझमवर लावण्यात आला होता.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.