राणेंच्या पेट्रोल पंपावर वैभव नाईकांची दादागिरी

19 Jun 2021 12:13:01

bjp-shivsena_1  



सिंधुदुर्ग :
मुंबईतील दादरयेथील शिवसेना-भाजप वाद ताजा असतानाच आता कोकणात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाला. यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले.शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी येथील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यानी शिवसेनेचा हा प्रयत्न हणून पाडला. त्यामुळे दोन गटात वादावादी झाली. भाजप नेते निलेश राणेंनी या घटनेवर प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला.


आज शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आमदार वैभव नाईक यांनी एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्याठिकाण आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावूनही गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.


या घटनेवर प्रतिक्रिया देताना निलेश राणे म्हणतात,शिवसेना पक्ष इतका भिकारी झाला आहे की त्यांच्या आमदाराला दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करायचा आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक भिकाऱ्यासारखा पंपा बाहेर उभा होता तेव्हा त्याला तिथून हाकलून दिलं. ही लायकी आजच्या शिवसेनेची आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

Powered By Sangraha 9.0