गाझियाबादमधील घटनेप्रकरणी ट्विटरला नोटीस

19 Jun 2021 12:06:56
 
twitter_1  H x

 
आठवड्याभरात जबाब नोंदवा - उत्तर प्रदेश पोलिस
 
लखनौ : दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी चित्रफीत व्हायरल झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी ट्विटरविरोधात आता पुढील कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे.पोलिसांनी ट्विटरला एक नोटीस बजावली असून याप्रकरणी आठवड्याभरात जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.


पोलिसांच्या कारवाईनंतर ट्विटरच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी ट्विटरच्या जबाबदार अधिकार्‍यांच्या चौकशीची तयारी सुरू केली आहे. पोलिसांनी ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांच्या नावे ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच, त्यांना सात दिवसांच्या आत लोनी बॉर्डर पोलीस ठाण्यामध्ये येऊन जबाब नोंदवण्यास सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0