mpsc विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर लोटांगण

19 Jun 2021 14:32:14
 
lotangan_1  H x
 
mpsc मध्ये उत्तीर्ण होवूनही नियुक्तीपत्र नाही

पुणे : मागील वर्षी mpsc मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनेक यशस्वी भावी अधिकाऱ्यांना अजून नियुक्ती मिळालेली नाही . कित्येक महिने उलटले तरी अजून हातात नियुक्तीपत्र मिळत नाही म्हणून चिंतीत झालेल्या युवकांनी आता पुण्याच्या जिल्ह्धिकारी कार्यालयासमोर लोटांगण घातले आहे. आम्हास लवकरात लवकर नियुक्तीपत्र मिळावे अशी या युवकांची मागणी आहे.

काही दिवसांपूर्वी याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र ही लिहिले होते. परंतु याविषयाबाबत अजून काहीच निर्णय लागत नाही आहे. त्यामुळे या युवकांनी शनिवारी १९ जून सकाळपासून भरपावसात लोटांगण घालण्यास सुरुवात केली आहे. अशी अजून किती पावसात आम्हाला भिजावे लागणार आहे. असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला आहे. एकीकडे परीक्षा होत नाही आहेत तर दुसरीकडे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अजून नियुक्तीपत्र मिळत नाही आहे,यावरून mpsc चा आंधळा कारोबार पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.
Powered By Sangraha 9.0