जो.बायडन पेक्षाही पंतप्रधान मोदीच जगातील लोकप्रिय नेते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2021
Total Views |

narendra modi _1 &nb




मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधक कितीही आगपाखड करत असले, तरी त्यांची लोकप्रियता ही वाढत असताना दिसत आहे. अशातच अमेरिकेतील एका डेटा इंटेलिजेंसने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मोदी हे सर्वोत्कृष्ट नेते असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील सर्वाधिक 'ग्लोबल अप्रूवल लिडर' असून ते लोकप्रिय असल्याचे या सर्वेक्षणाअंती समोर आले आहे.
 
 
 
पंतप्रधान मोंदीनी कोरोनाची परिस्थिती व्यवस्थित हातळली नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीतही मोदीच्या लोकप्रियतेमध्ये तसुभरही प्रभाव पडलेला नाही. आजही ते जगभरात प्रसिद्ध नेते आहेत. त्यासंबंधीचे एक नवे सर्वेक्षण समोर आले आहे. अमेरिकेतील डेटा इंटेलिजेंस फर्म 'मॉर्निंग कंसल्ट' द्वारे केलेल्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ग्लोबल अप्रूवल लिडर' म्हणून स्विकारलं आहे. जागतिक नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वेक्षणात पुढे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच ग्लोबल अप्रूवल रेटिंग ६६ टक्के आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळातही पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, ब्रिटेन, रूस, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशातील इतर नेत्यांपेक्षा अव्वल ठरले आहेत.
 
 
 
 
अमेरिका डेटा इंटेलिजेंस फर्म 'मॉर्निंग कंसल्ट' द्वारे एक सर्वेक्षण केले. त्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोदींची लोकप्रियता आणि अप्रूवल रेटिंगमध्ये घसरण पाहायला मिळाली. असं असलं तरीही मोदी यादीमध्ये टॉपवरच आहेत. इतर नेत्यांच्या तुलनेत त्यांचं काम चांगल आहे. या अप्रूवल रेटिंगमध्ये मोदींच्या पाठोपाठ इटलीचे पंतप्रधान मारियो ड्रॅग यांचा नंबर लागतो. ज्यांची अप्रूवल रेटिंग ६५ टक्के आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती लोपेज ओब्रेडोर असून त्यांची रेटिंग ६३ टक्के आहे.

@@AUTHORINFO_V1@@