WTC Final : ये खेल कब शुरू होगा ? सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस

18 Jun 2021 19:08:29

memes_1  H x W:
 
 
मुंबई : शुक्रवारी सुरु होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पावसाने घोळ घातला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या या अंतिम सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी वात बघत होते. मात्र, पहिल्या दिवसाचे पहिले सत्र संपूर्ण पाण्याखाली गेले. यानंतर सोशल मिडियावर मिम्सचा पाऊस लोकांनी अनुभवला. ट्विटरवर तसेच इंस्टाग्रामवरही लोकांनी मजेदार मिम्स शेअर केले.
 
 
 
 
 
 
या मिम्सद्वारे ट्विटरवर अनेकांनी राग व्यक्त केला. तर काहींनी 'आता क्रिकेट ऐवजी स्विमिंगची स्पर्धा करा पण एक विजेता द्याच' असे गमतीशीर सल्लेदेखील दिले. यावेळी काहींनी आयसीसीच्या आयोजनावरदेखील प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे मैदानात तरी नाही पण मैदानाबाहेर या सामन्याची अशीही चर्चा रंगली होती. सर्वांनी हा सामना सुरु होवोत आणि एकच विजेता मिळो अशी इच्छा व्यक्त केली आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0