पोस्टातील 'या' FD मिळणार आकर्षक व्याज; जाणून घ्या फायद्याची बातमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2021
Total Views |
POST OFFIC_1  H
 
 
नवी दिल्ली : सध्याच्या काळात कोठे सुरक्षित गुंतवणूक करावी हा प्रश्न सर्वाना पडला आहे? याचे उत्तर फिक्स्ड डीपोजिट हे आहे,पण मग नककी कोठे फिक्स्ड डिपॉझिट करणे सुरक्षित आहे? तर ते सुरक्षित आहे पोस्ट ऑफीस यामध्ये , पोस्ट ऑफिस मध्ये फिक्स्ड डीपोजिट केल्यास आपल्याला केंद्र सरकारची शाश्वती सुद्धा मिळू शकते तसेच तिमाही व्याज सुद्धा मिळेल.


तुम्ही १,२,३,४,५ वर्षासाठी पोस्ट ऑफिस मध्ये फिक्स्ड डीपोजिट करू शकता हे करण्याचे काय मिळणार फायदे ?

१.पोस्ट ऑफिस मध्ये फिक्स्ड डीपोजिट केल्यास आपल्याला केंद्र सरकारची शाश्वती सुद्धा मिळते.
२. हि सरकारी योजना आहे गुंतणुकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित
३. तुम्ही पोस्ट ऑफीस मध्ये फिक्स्ड डिपॉझिट ऑफलाईन (कॅश किंवा चेक) ने तसंच ऑनलाईन(नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंग) नेही करू शकता.
४. १ पेक्षा जास्त फिक्स्ड डिपॉझिट करू शकता,फिक्स्ड डिपॉझिट जॉईंट सुद्धा करू शकता
५. पाच वर्षांपेक्षा जास्त काळाची फिक्स्ड डिपॉझिट केल्यास टॅक्स मध्ये सूट
६. एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये सहजरीत्या ट्रान्सफर
७. मुलाचे खाते देखील उघडता येते तसेच पालक आपल्या मुलांच्या नावे खाते उघडू शकतात. परंतु जर मूल 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असेल तर ते स्वत: खाते देखील हाताळू शकते. याशिवाय या योजनेंतर्गत आपल्याला पाहिजे तितकी खाती उघडता येतात.


 कसे उघडावे अकाउंट ? किती असेल व्याज ?
 
आपण पोस्ट ऑफिसमध्ये अवघ्या १००० रुपयांत टाईम डिपॉझिट खाते उघडू शकता. यासाठी आपल्याला जवळच्या टपाल कार्यालयात जावे लागेल. कोणतीही जास्तीत जास्त गुंतवणूक मर्यादा नाही, तर फक्त ५०० रुपयांमध्ये आपण पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडीवर १ ते ३ वर्षासाठी ५.५ टक्के आणि ५ वर्षांच्या गुंतवणुकीवर ६.७ टक्के व्याज मिळेल. हे व्याज तिमाही आधारावर मोजले जाते आणि दरवर्षी ते दिले जाते.
 
@@AUTHORINFO_V1@@