महाराजांच्या अर्थनितीचे धडे आता पदव्युत्तर अभ्यासक्रमात

18 Jun 2021 17:10:49

SHIVAJI MAHRAJ_1 &nb
 
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभरातील अभ्यासकांच्या आवडीचा विषय आहे. जगभरातील संशोधक महाराष्ट्रात महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी आग्रही असतात.आजच्या आधुनिक जगातसुद्धा त्यांनी आखलेल्या रणनीती, अर्थशास्त्र व सामाजिक शास्त्र अभ्यासकांना आकर्षित करतात. याच पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संरक्षण आणि सामाजिक शास्त्र विभागाअंतर्गत एक पदव्युत्तर पदविका कोर्स यंदाच्या वर्षीपासून सुरु केला आहे.

 
या महाराजांची युद्धनीती महाराजांचे प्रशासक म्हणून असलेले कार्य, महाराजांनी राबवलेली कल्याणकारी योजना आणि महाराजांची अर्थनीती याचे धडे पदव्युत्तर पदविकेच्या अभ्यासक्रमातून युवकांना शिकायला मिळणार आहे.या अभ्यासक्रमाचे नाव 'छत्रपती शिवाजी महाराज : व्हिजन एँड नेशन बिल्डिंग' असे आहे. या अभ्यासक्रमासाठीची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी अधिक माहितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे
Powered By Sangraha 9.0