हिंदू म्हणून स्वतंत्र जगायचे असेल तर सावरकरांच्या विचारांचे स्मरण आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2021
Total Views |

savrkar_1  H x  
 

रणजित सावरकर यांचे मत
 

 
मुंबई : “भारताची पुन्हा फाळणी होऊ नये असे वाटत असेल आणि ‘गजवा हिंद’चा कट यशस्वी होऊन येथे पुन्हा मोगलाई यावी, असे वाटत नसेल आणि आपली मुलेबाळे हिंदू म्हणून स्वतंत्र जगावित, असे वाटत असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेल्या विचारांचे स्मरण करावे. इतिहासामध्ये त्यांचे मार्गदर्शन आपण ऐकले नाही म्हणून फाळणी झाली. आता मात्र त्यांचे ऐकले तरच आपल्याला भवितव्य आहे,” असे स्पष्ट मत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी नुकतेच व्यक्त केले. सावरकर स्मारकाने आयोजित केलेल्या ‘वीर सावरकर कालापानी मुक्ती शताब्दी ऑनलाईन व्याख्यानमाले’मध्ये ‘सावरकर और हिंदू संघटन’ या विषयावरील व्याख्यानामध्ये रणजित सावरकर बोलत होते.

यावेळी रणजित सावरकर म्हणाले की, “आपण इतिहासाला विसरून चालणार नाही. आपण त्यापासून शिकले पाहिजे. १९२१ मध्ये भारतात मुसलमानांची संख्या २२ टक्के होती. फाळणीनंतर कमी झालेल्या संख्येनंतरही मुसलमानांची आज भारतातील लोकसंख्या २२ टक्के आहे. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले त्यादरम्यान मुसलमानांची संख्या जी १९२१ मध्ये २२ टक्के होती ती वाढून ३५ टक्के झाल्याने देशाची फाळणी झाली. आजही देशातील मुसलमानांची संख्या वाढत असून ही संख्या सीमेवरून होणार्‍या घुसखोरीमुळे वाढली आहे. बेकायदेशीरपणे भारतात आलेले रोहिंगे, बांगलादेशी मुसलमान यांनी ही संख्या वाढली आहे.
 
 
त्यामुळेच पुन्हा भारताचे विभाजन होऊ नये, यासाठी इतिहासापासून लोकांनी धडा घेतला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे अंदमानातून परत आले. त्यानंतर त्यांनी केलेले काम लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसार वाटचाल केली पाहिजे. सावरकर काय किंवा अन्य क्रांतिकारक काय त्यांनी आपापले काम पूर्ण केले, स्वतःची आहुतीही त्यांनी दिली. ते आपण कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून त्यांनी आपले काम केले नाही. मात्र, आपण कृतज्ञता व्यक्त काकावी ती इतिहास अभ्यासून, त्यातील चुका लक्षात घेत त्या पुन्हा होणार नाहीत, यासाठी तशी कृती करून, तसे केले तरच आपले भविष्य वाचेल या स्वार्थासाठी तरी या मुक्ती शताब्दीला लक्षात ठेवले पाहिजे. सावरकरांचे विचार लक्षात घेऊन त्यांचे स्मरण करावे तर तीच खरी श्रद्धांजली असेल.”
 
 
आपल्या या व्याख्यानामध्ये अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे निर्माते सय्यद अहमद यांनी मुसलमानांच्या एकत्रिकरणाला, द्विराष्ट्रवादाला कसे खतपाणी घातले तेव्हापासून, तसेच या अलिगढ विचारसरणीला माना, असे सांगत मुस्लीम क्रांतिकारकांना सावरकरांच्या अभिनव भारत पासून दूर करू पाहाणार्‍यांबाबतही माहिती दिली.






 
 
@@AUTHORINFO_V1@@