जिल्ह्याचे पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेड उपलब्धतेची आकडेवारी जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2021
Total Views |
 
CORONA DCRESING_1 &n

 
गोंदियाचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वात कमी तर कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यात सर्वात अधिक


मुंबई : राज्य सरकारकडून जिल्ह्याचे पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. गोंदियाचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वात कमी तर कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यात सर्वात अधिक आहे. गेल्या आठवड्यापेक्षा मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
 
 
राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी पाच स्तरावर आखणी करण्यात आली आहे. या आठवड्यातही कोल्हापूर अजूनही डेंजर झोनमध्ये आहे. राज्यातील पॉझीटिव्हिटी रेट किती आहे, यावर ही आखणी करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्य सरकारने नव्याने आकडेवारी जाहीर केली आहे. यात कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक म्हणजेच १३.७७% इतका आहे. त्याखालोखाल रायगड जिल्ह्यामध्ये १२.७७% पॉझिटिव्हिटी रेट आहे. तर तिथेच कोल्हापूरमध्ये ऑक्सिजन बेड हे ५४.७८ टक्के भरले आहेत. तर रायगडमध्ये त्यामानाने ऑक्सिजन बेड हे केवळ १४.६ टक्के इतकेच भरलेले आहेत.

 
या आठवड्यात मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या आठवड्यामध्ये मुंबई आणि उपनगराचा पॉझिटिव्हिटी रेट हा ३.७९ टक्के इतका आहे. तर ऑक्सिजन बेड ते २३.१५ टक्के इतके व्यापले आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा ४.४० टक्के इतका होता. गेल्या आठवड्यात मुंबई तिसऱ्या टप्प्यातले नियम लागू करण्यात आले होते. मात्र, या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट अजून कमी झाल्या कारणाने मुंबईसाठी अजून नियम शिथिल केले जात आहेत का? याकडे मुंबईकरांचे लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे मुंबईच्या लोकल ट्रेनबाबत काय निर्णय घेण्यात येणार आहे? याकडे मुंबईकरांचे लक्ष असणार आहे.

 
पाचस्तरीय किंवा टप्प्यांची आखणी कशाप्रकारे -

 
पहिला स्तर - पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी, तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असावेत
 
दुसरा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्यांपेक्षा कमी, ऑक्सिजन बेड २५ ते ४० टक्क्यापेक्षा भरलेले
 
तिसरा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट ५ ते १० टक्यांपेक्षा कमी, तसेच ऑक्सिजन बेड ४० टक्यांपेक्षा जास्त भरलेले
 
चौथा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्यांपेक्षा कमी, तसेच ऑक्सिजन बेड ६० टक्यांपेक्षा जास्त भरलेले
 

पाचवा स्तर - पॉझिटिव्हिटी रेट २० टक्यांपेक्षा जास्त, तसेच ऑक्सिजन बेड ७५ टक्यांपेक्षा जास्त भरलेले .
 
@@AUTHORINFO_V1@@