२० जुलै रोजी दहावी, तर ३१ जुलैला बारावीचा निकाल -‘सीबीएसई’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2021
Total Views |

CBSE_1  H x W:



नवी दिल्ली :
यंदाच्या वर्षी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल येत्या दि. २० जुलै रोजी, तर बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचा निकाल दि. ३१ जुलै रोजी लागणार असल्याची घोषणा ‘सीबीएसई’ बोर्डाने गुरुवार, दि. १७ जून रोजी केली. ‘सीबीएसई’ बोर्डाचे नियंत्रक संयम भारद्वाज यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले की, “दहावीचा निकाल दि. २० जुलै रोजी आणि बारावीचा निकाल दि. ३१ जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, जेणेकरुन ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी जायचे आहे, त्यांना काही अडचणी यायला नको.

आजच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सीबीएसई बोर्डाकडून सर्वोच्च न्यायालयापुढे सादर करण्यात आला. ’४०: ३०: ३०’ या फॉर्म्युल्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. मूल्यमापनाच्या या पद्धतीनुसार, यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के गुण देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते अकरावीच्या अंतिम परीक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि ‘प्रिलीयम’ परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील,” असे त्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@