WTC 2021: है तय्यार हम ! विराट सेना सज्ज...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2021
Total Views |

Virat_1  H x W:
 
मुंबई : गेल्या १४४ वर्षांच्या क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये कोण सर्वोत्तम आहे? हे जाणून घेण्यासाठी खेळवली जाणार आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. संपूर्ण जगाचे या अंतिम सामन्याकडे लक्ष लागले आहे. भारत आणि न्यूझीलंडचा संघ हा इंग्लंडच्या साउथॅम्प्टन या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता विराट सेना २०१९मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढणार का? की न्यूझीलंडचा संघ अंतिम सामना जिंकून पहिले कसोटी चॅम्पियन बनण्याचा मान मिळवणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
 
 
 
 
 
विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय संघाचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सर्व खेळाडू, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह संपूर्ण स्टाफ पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये अंतिम सामन्यासाठी निवडण्यात आलेले १५ खेळाडू प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह पाहायला मिळत आहेत. विराटने शेअर केलेल्या फोटोवर चाहते भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी भरभरून शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील महामुकाबल्याला भारतीय वेळेनुसार उद्या दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@