इस्लाम स्विकारण्यास नकार; अल्पवयीन मुलीवर मालेगावमध्ये सामुहिक बलात्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2021
Total Views |
lj_1  H x W: 0


महाराष्ट्रातही लव्ह जिहादचा विळखा
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : मालेगावमध्ये मोलमजुरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर इस्लाम स्विकारला नाही म्हणून सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. सदर मुलीस २३ वर्षीय माजिद खान याने मोहित हे नाव सांगून अत्याचार केल्याचे पोलिसांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
 
 
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील १५ वर्षीय तरुणी महाराष्ट्रात मालेगावमध्ये कामगार म्हणून काम करीत होती. मालेगावमध्ये तिचा संपर्क २३ वर्षीय माजिद खान याच्याशी आला. खान याने आपले नाव मोहित असल्याचे सांगून तरुणीस आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आश्वासन देऊन माजिद खान याने तरुणीचे शारिरीक शोषणही केले. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून माजिद खान याने सदर तरुणीस इस्लाम स्विकारण्याची सक्ती करण्यास प्रारंभ केला.
 
 
 
मात्र, तरुणीने इस्लाम स्विकारण्यास नकार दिल्यानंतर माजिद खान आणि त्याच्या तीन साथीदारांनी सदर तरुणीवर वारंवार सामुहिक बलात्कार केला. त्यामुळे सदर तरुणी गरोदर राहिली होती. मात्र, घाबरलेल्या तरुणीने व तिच्या कुटुंबियांनी या प्रकाराची पोलिस तक्रार न करता तरुणीस उज्जैन येथे तिच्या बहिणीच्या घरी पाठवून दिले होते. मात्र, सदर तरुणीस जबर मानसिक धक्का बसल्याने तिची वेळेपूर्वीच प्रसुती झाली. प्रसुतीसाठी रुग्णालयात असताना तेथे एका महिलेस सदर तरुणीने आपल्यावरील अत्याचारांची माहिती दिली. त्या महिलेने हिंदुत्ववादी संघटनांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिल्याने लव्ह जिहाद आणि सामुहिक बलात्काराचा प्रकार समोर आला.
 
 
 
दरम्यान, पोलिस पुढील तपास करीत आहेत. अकाली प्रसुतीमध्ये दगाविलेल्या भृणाची डीएनए चाचणी केली जाणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@