हॉटेल बल्लाळेश्वर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2021
Total Views |

Hotel_1  H x W:
 
 
‘हॉटेल बल्लाळेश्वर’ची सुरुवात १९५३ साली जुन्नर तालुक्यात बल्लाळ या गावी माझ्या आजोबांनी केली. माझ्या वडिलांनी त्यांना सहकार्य केले. मीदेखील लहान असल्यापासून त्यांना कामात मदत करीत असे. एकदा माझ्या वडिलांना मी सुचवले की, आपल्या हॉटेलची खासियत आहे, ती इतरत्र पसरावी. परंतु, वडिलांनी त्यास नकार दिला. पण मी त्यांचा विरोध झुगारून गाव सोडले. जुन्नर येथील ओझर गाव येथे हॉटेलची नव्या रूपाने मी सुरुवात केली. बंधू गजानन गावडे यांचे मला मोठे सहकार्य लाभले. पाच वर्षे मी तेथे उत्तम काम केले. परंतु, यापेक्षा मोठे काही करण्याचा ध्यास होता. मुंबईला जाऊन काही करावे, अशी इच्छा होती. परंतु, ते सोपे नव्हते. म्हणून मी काही ‘बिझनेस मोटिव्हेशन’ व ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’चे कोर्सेस केले. ‘हॉटेल मॅनेजमेंट’च्या ‘टेक्निक’ शिकलो व स्वतःला पूर्ण सक्षम केले.
 
 
 
मुंबईजवळील डोंबिवली येथे ‘हॉटेल बल्लाळेश्वर’ला पूर्ण नव्या स्वरूपात सुरुवात केली. ’डॉमिनोज’, ’पिझ्झा हट’ येथे गेल्यानंतर आपल्याला एक वेगळे वातावरण व सर्व्हिस मिळते. त्यापद्धतीने लोकांना महाराष्ट्रीय पदार्थ खाताना तेच वातावरण व सर्व्हिस आपण द्यावी, असा विचार मनात आला. त्यानुसार स्वच्छता, रंगसंगती, इंटेरिअर, स्टाफ ट्रेनिंग, युनिफॉर्म यावर मेहनत घेतली. विदेशी खाद्यपदार्थांप्रमाणे महाराष्ट्रीय पदार्थांनादेखील आपण वेगळी ओळख व लोकप्रियता मिळवून द्यावी, याकरिता ब्रॅण्डिंग केले. यासाठी प्रयत्न केले. मुंबईमध्ये सर्व्हे करताना असे दिसले की, येथे शेट्टी, राजस्थानी लोक या व्यवसायात जास्त आहेत व मराठी लोक कमी आढळले.
 
 
आपल्या महाराष्ट्राची खासियत असलेल्या पदार्थांना प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी ‘ब्रॅण्डिंग’चा विचार केला. आमची खासियत असलेल्या मिसळमध्ये वापरले जाणारे फरसाण व मसाले आम्ही स्वतः बनवतो. ‘संतुष्ट ग्राहक’ हे आमचे मिशन आहे. तसेच येथे महाराष्ट्रीय पद्धतीने आदरातिथ्य केले जाते. त्यामुळे येथे आलेला प्रत्येक जण संतुष्ट होऊन बाहेर पडतो. प्रत्येक गोष्टीकडे ‘युनिक अ‍ॅन्गल’ने बघून ब्रॅण्ड उभारला. ‘ब्रॅण्ड’ बनवताना एकच संकल्पना डोक्यात होती. आज मराठी माणूस व्यवसायापासून लांब आहे व नोकरीमध्ये गुंतला आहे. जास्तीत जास्त मराठी लोकांनी व्यवसायात यावे व बिझनेस करावा. ‘ब्रॅण्डिंग’ केल्यानंतर ‘फ्रेंचायसी’करिता ‘ऑफर’ येऊ लागल्या. आज महाराष्ट्रात आमच्या ४० ब्रँचेस आहेत. त्यात कल्याण, ठाणे, मुलुंड, पनवेल, पुणे, मालाड, कळंबोली, रांजणगाव, उस्मानाबाद या ठिकाणांचा समावेश आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत महाराष्ट्रात १०१ ब्रँचेस सुरु करणार आहोत. त्याकरिता काम सुरू आहे.
 

‘हॅाटेल बल्लाळेश्वर’ व विजय गावडे यांना मिळालेले पुरस्कार :
 
 
 
१) महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रॅण्ड २०१८-१९ (अर्थसंकेत)
२) ‘वेल्थ क्रिएटर्स’ (दै. ’मुंबई तरुण भारत’ वृत्तपत्रातर्फे नितीन गडकरी यांच्या हस्ते)
३) यशस्वी उद्योजक (मनोहर जोशी यांच्या हस्ते)
४) ‘बिझनेस एक्सलेंट अ‍ॅवॉर्ड’ (विनर्स एज्युकेशन ट्रस्ट)
लक्ष्य २०३२ चे!
 
 
हॅाटेल व्यवसायांचे बाळकडू प्यायलेली व्यक्ती छोटा विचार कसा करेल. ’मोठे विचार मोठे स्वप्न’ पाहणार्‍या विजय गावडे यांच्या मनात ‘हॉटेल बल्लाळेश्वर’ हे विश्वातील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल्सपैकी एक हॉटेल म्हणून प्रसिद्ध व्हावे, ही गोष्ट येणे साहजिकच आहे. हा विचार मनातच न ठेवता २०३२ पर्यंत ‘हॉटेल बल्लाळेश्वर’ हे महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध हॉटेल म्हणून साकारण्याची योजना त्यांनी आखली आहे आणि त्या दृष्टीने कार्यसुद्धा सुरु केले आहे. हे जगप्रसिद्ध हॉटेल महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राष्ट्रीय व परदेशी पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनेल, असा दृष्टिकोन त्यांनी समोर ठेवला आहे.
- विजय गावडे
(संपर्क : हॅाटेल बल्लाळेश्वर - विजय गावडे - ९८९००९०६२९)
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@