शिवसैनिकांना हिसका दाखवणाऱ्या अक्षता तेंडुलकर सोशल मीडियावर व्हायरल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2021
Total Views |

Akshata 1 Akshata  _1&nbs


शिवसैनिकांना एकट्या भिडल्या अक्षता तेंडुलकर

मुंबई : अयोद्धेत प्रभू श्रीराम मंदिराच्या मुद्द्यावरून दादर शिवसेना भवन परिसरात आंदोलन करणाऱ्या भाजप युवा मोर्चातील आंदोलकांवर बेछूट तुटून पडलेल्या शिवसैनिकांना भाजपच्या माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी चांगलाच हिसका दाखवला. "महिलेवर हात टाकणाऱ्या शिवसैनिकांची खरी मदुर्मकी मला आज कळली," अशी प्रतिक्रीया अक्षता तेंडुलकर यांनी या घटनेवर दिली. झुंडीने हाणामारीसाठी अंगावर आलेल्या शिवसैनिकांना शिंगावर घेणाऱ्या अक्षता तेंडुलकर यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
 
 
 
या प्रकरणा दै.'मुंबई तरुण भारत'च्या प्रतिनिधींनी तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला असता. त्या म्हणाल्या, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आज महाविकास आघाडी सरकारमध्ये महिला सुरक्षित नाहीत. भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षातील एका महिला पदाधिकाऱ्याला शिवसैनिकांकडून मारहाण होत असेल तर सर्वसामान्य माताभगिनींचे काय?, बाळासाहेबांची शिवसेना आता राहिलेली नाही. ती शिवसेना केव्हाच संपली. शिवसेनेने हिंदूत्वाला केव्हाच तिलांजली दिली आहे. खंडणी वसुल करत टक्केवारीत अडकलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात एकाही महिलेविषयी आदर राहिलेला नाही. 'दादर आपले' या भ्रमात शिवसैनिकांनी राहू नये, त्यांना जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहोत."


Akshata 1 _1  H
 
 
दरम्यान, या प्रकरणात भाजपयुमोच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्या प्रकरणी माजी महापौर श्रद्धा जाधव एकूण आठ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चा मुंबई प्रदेश अध्यक्ष तेजिंदरसिंह तिवाना यांच्या नेत-त्वात दादरच्या सेना भवनवर आंदोलन करण्यात येणार होते. अयोद्धेतील कथित जमीन गैरव्यवहाराचा आरोप केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. त्याचवेळी अचानक धावून आलेले शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केला होता.
@@AUTHORINFO_V1@@