भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना शिवसैनिकाकडून मारहाण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2021
Total Views |

bjym_1  H x W:



मुंबई : राम मंदिर भूमीसंपादन मुद्द्यावरून आता महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना आमने-सामने आल्याचे पाहायला आहे. अशातच मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढला.मात्र राम मंदिरावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून शिवसेना भवनासमोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर गेले. राम मंदिर जमीन खरेदी व्यवहारावरून झालेल्या आरोपावरून भाजपाने फटकार मोर्चा आयोजित केला होता. भाजप युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान भाजप कार्यकर्त्यानी आपल्याला शिवसेना कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यावेळी काही शिवसैनिकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. भाजपच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आली, तर महिलांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.


राम मंदिरासाठी जगभरातून शेकडो कोटींचा निधी येत आहे. प्रभू रामचंद्राच्या नावाने एकही घोटाळा व्हायला नको. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये भाजपशी संबंधित सदस्य आहेत. शिवसेनेचा एकही सदस्य नाही. रामभक्तांच्या श्रद्धेला तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशायस्पद प्रकरण समोर आले आहे. ते खरं की खोटं याचा लगेच खुलासा झाला तर बरं. ट्रस्टनं याबाबत खुलासा करायला हवा.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.

मात्र, यासर्व आरोपानंतर राम जन्मभूमी ट्रस्टने कराराचा सर्व तपशील सादर करत आरोपांचे खंडन केले आहे. अयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप करून शिवसेना उर्फ ​​सोनिया सेनेने हिंदू धर्म, हिंदू धार्मिक स्थळ आणि हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्था यांचा अपमान केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईतर्फे शिवसेनेच्या या शुल्लक राजकीय षडयंत्रविरोधात “फटकार मोर्चा” आयोजित करण्यात आला आहे, हा तीव्र निषेध भाजप शिवसेना भवन समोर करत आहे, असं भाजप युवा मोर्चाने म्हटलं आहे.

@@AUTHORINFO_V1@@