विमानतळ नामकरण वाद : अटकेतील अभिनेता मयुरेश कोटकरला जामीन

16 Jun 2021 20:54:01

eknath shinde_1 &nbs
 
 
 
ठाणे : नवी मुंबईच्या विमानतळ नामकरण वादात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता मयुरेश कोटकर याला ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या वैयक्तीक जात मुचलक्यावर त्याची सुटका केली.
 
 
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नावे देण्यात यावे अशी मागणी आगरी कोळी समाजातील नागरिकांकडून केली जात आहे. या पार्श्वभुमीवर, दि.बा.पाटील यांच्या नावासाठी आग्रही असलेला अभिनेता मयुरेश कोटकर याने त्याच्या फेसबुक खात्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याची तक्रार शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांनी दिली होती.यावरून रविवारी श्रीनगर पोलीसानी मयुरेशला अटक केली होती.
 
सोमवारी मयुरेशला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.मंगळवारी मयुरेशचे वकील गजानन चव्हाण यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे युक्तीवाद केला.त्यानंतर बुधवारी न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर मयुरेशची मुक्तता करण्याचे आदेश दिले.तसेच दर सोमवारी त्याने पोलीस ठाण्यात हजेरी लावावी.असेही आदेश न्यायालयाने दिले.
Powered By Sangraha 9.0