नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन मराठवाडाआंदोलनाची परिस्थिती उद्भवू शकतेभूमीपूत्रांचा इशारा

15 Jun 2021 21:03:39
 
 
 navi mumbai airport meeti 

 
 
डोंबिवली : नवी मुंबई विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव द्यायचे या मुद्दयावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे ठाम आहेत . आतापर्यत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्याचे नाव कु ठेही दिले नाही. हे पहिले मुख्यमंत्री आहेत जे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळाला देण्यावर ठाम आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामकरणाच्या मुद्दयांवर कॉग्रेसला 25 ते 30 जागा गमवाव्या लागल्या होत्या. आपल्या आंदोलनातून राज्यसरकारला ही या गोष्टीची जाणीव होण्याची गरज आहे. ती परिस्थिती आपण निर्माण करू शकतो. कदाचित विमानतळाचे नामकरण होण्यास अजून पाच वर्षाचा कालवधी जाईल. तोर्पयत सरकार ही बदलेल. आपला लढा मोठा आहे. संयमाने वागा, असा सूर नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीतून उमटला.


नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी प्रगती महाविद्यालयातील सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भूमीपुत्रासह सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी यांच्यासह शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर हे देखील उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी होत आहे. ते पाटील पनवेल रायगड भागातील शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नेते होते. महाराष्ट्राच्या विधानसभेत ते विरोधी पक्ष नेते ही राहिले आहेत. पाटील यांनी नवी मुंबईच्या निर्मितीवेळीस ,जेएनपीटीसारख्या बंदराच्या उभारणीच्या वेळीस स्थानिक नागरिकांना हक्क मिळवून देण्यासाठी निर्णायक लढा दिला होता. पण त्यांचे नाव कोणत्याही प्रकल्पाला नाही. त्यामुळे विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे ही मागणी जोर धरत आहे. यासाठी भूमीपुत्रासह सर्व पक्षीय संरक्षण हक्क समितीने मुख्यमंत्र्याची भेट घेतली. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शिवसेना संस्थापक दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्याच्या मुद्दय़ावर ठाम आहे. सर्व पक्षीय नेते पक्ष विसरून दि. बा. पाटील यांच्या नावाला पांठिबा देण्यासाठी पुढे आले आहेत. या नावाला भूमीपुत्रासह, शिवसेना कार्यकत्याचा ही पांठिबा आहे. पण भूमिपुत्रांनी संयमानी वागावे. एकमेकांवर विश्वास ठेवावा. या लढाईला आता सुरूवात झाली आहे. कुणीही चिथावण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तुम्ही बळी पडू नका. कोणतेही आक्षेपार्ह विधान सोशल मिडीयावर करू नका, असे आंदोलकांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
 

कपिल पाटील, आपला समाज विषय पकडतो आणि सोडून देतो ही आपल्यात कमतरता आहे. दि. बा. पाटीलचा नाव देण्यासाठी जो भूमीपुत्र आंदोलनात सहभागी होईल तोच खरा भूमीपुत्र आहे अशी भूमिका घेतल्यास आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त होईल. एखादा पक्षाचा नेता आंदोलनाला विरोध करतो म्हणून संपूर्ण गाव त्याला विरोध करतो असा त्यांचा अर्थ होत नाही. समृध्दी महामार्गाला बाळासाहेबांचा नाव देण्यात येणार आहे. आम्ही त्याला विरोध केला नाही. त्यांचे व्यक्तीमत्त्वच तसे आहे. पण आता तुम्ही आमच्या दि. बा. पाटील यांच्या नावाला विरोध करीत आहे. सिडकोने ठराव पास केला असला तरी सिडको आली कोठून असा सवाल ही त्यांनी केला. सिडकोला भूमीपुत्रंानी जागा दिली म्हणून सिडको आहे. त्यासाठी आमच्या भूमीपुत्रंाचे पैसे लागले आहेत. आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि कॉग्रेस यांची भूमिका काय आहे ते पाहिले पाहिजे. पक्षाच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केल्यावर त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता या आंदोलनात सहभागी होतील. या आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त होईल, असे सांगितले.
 

या आंदोलनाला भाजपाने पांठिबा दिला आहे. मनसे आणि रिपाई गटाने यापूर्वीच आंदोलनाला पांठिबा दिला आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे सोडून इतर कुणीही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला पांठिबा देत नाही. भूमीपुत्र आता 24 जूनला सिडकोला घेराव घालून पुन्हा एकदा आपल्या एकीचे दर्शन राज्यसरकारला घडविणार आहेत यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
 

या बैठकीला भाजपाचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपा खासदार कपिल पाटील, मनसे आमदार राजू पाटील,आमदार किसन कथोरे, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर, संघर्ष समितीचे सदस्य गुलाब वझे, कॉग्रेसचे संतोष केणे , रिपाई अध्यक्ष अकुंश गायकवाड,माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी ,आमदार प्रशांत ठाकूर, रिपाई प्रल्हाद जाधव, पनवेल उपमहापौर जगदीश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 

------------------------------------------------------------
Powered By Sangraha 9.0