WTC Final Top 15 : के. एल. राहुल बाहेर, सोशल मिडीयावर नाराजी

15 Jun 2021 20:53:53

Virat_1  H x W:
 
 
मुंबई : १८ जूनपासून होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या नातीं सामन्याला सुरुवात होणार आहे. अवघे काहीच दिवस शिल्लक असताना बीसीसीआय १५ अंतिम खेळाडूंची एक यादी जाहीर केली. मात्र, यामध्ये सध्या फॉर्मात असलेला के. एल. राहुलला जागा न मिळाल्याने सोशल मिडीयावर क्रीडा प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघ २० खेळाडू आणि चार स्टॅण्डबाय खेळाडूंना घेऊन इंग्लंडला रवाना झाली. मात्र, अंतिम १५चा संघ जाहीर झाला असून शार्दुल ठाकूर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांना बाकड्यावरच बसावे लागणार आहे. तसेच, वृद्धिमान सहा आणि शुभमन गिलच्या निवडीवर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
 
 
 
 
 
असा आहे अव्वल १५चा संघ
 
 
 
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज
 
 
 
 
 
बीसीसीआयने अंतिम सामन्यासाठी १५ खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये शार्दुल ठाकूर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. तसेच, साऊथम्पटनमध्ये अंतिम सामन्याच्या प्रत्येक दिवशी ७० ते ८० टक्के पावसाचा अंदाज दर्शवला आहे.
 
 
 
 
 
 
खेळपट्टी जलद असून त्यावर बाऊन्सही असेल असे साऊथम्पटनच्या पिच क्युरेटरने सांगितले. पाऊस, ढगाळ वातावरण आणि खेळपट्टी यामुळे जडेजा आणि अश्विन यांच्यापैकी एकच फिरकीपटू खेळवायचे का? तसेच इशांत शर्माला संधी द्यायची की मोहम्मद सिराजला? हे प्रश्नदेखील विराटसमोर उभे असतली.
 
Powered By Sangraha 9.0