आपण आपल्या प्रसन्नतेची आणि सर्जनशीलतेची जबाबदारी स्वत: घेऊ शकतो, यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गुण आपण आपल्यात विकसित करू शकतो तो म्हणजे परिस्थिती प्रतिकूल असताना सकारात्मक कसे राहायचे? ‘हम होंगे कामयाब एक दिन’ या वाक्यात असणारी प्रचंड ऊर्जा आणि विश्वास आत लोकांना अंतर्यामी जाणवतो. अनिश्चिततेबरोबर जीवन जगायचे, तर संयमाची गरज आहे.
आज संपूर्ण जगात आपण उलथापालथ झालेली पाहतो. जगभर ‘कोविड’मुळे अनिश्चितता पसरलेली आहे. आपल्या दैनिक दिनक्रमामध्येसुद्धा व्यत्यय आलेला आहे. सामान्यतः लोकांमध्ये अनिश्चितता कमी करण्यासाठी ऐच्छिक शक्ती असते, पण ती वेगवेगळ्या पातळीवर काम करते. आपल्याला उद्या प्रमोशन नाही मिळाले, तर आपण काय करायचे? आपण आजारी पडलो तर काय होईल, यासारख्या शक्य-अशक्य जोखमींवर लक्ष केंद्रित करून लोक प्रतिक्रिया देतात. अशावेळी माणसाच्या मनात चिंता निर्माण होऊ शकतो. चिंता जेव्हा आपल्याला योग्य निर्णयाप्रत पोहोचविते तेव्हा ती फायद्याची ठरते, पण ती जेव्हा दीर्घ ठरते तेव्हा ती हानिकारक ठरू शकते. दीर्घकालीन चिंतेमुळे व्यक्तीच्या शारीरिक आरोग्यावर व रोगप्रतिकारक शक्तीवर अपाय होऊ शकतो. याशिवाय या जुनाट चिंतेपायी व्यक्तीची वैचारिक कार्यक्षमता कमी होऊ शकते. काही गोष्टी आपण अनिश्चिततेच्या वातावरणात चिंता कमी करण्यासाठी करू शकते आणि अशावेळी अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात, हे जाणूून घेणे खूप आवश्यक आहे, जे आधीच घडून गेले आहे ते आपल्या नियंत्रणात नसतं, इतरांनी कसं वागावं, हे आपल्या हातात नाही. आपल्यासमोर जे काही सद्यपरिस्थितीत घडत असतं, ते कधी थांबेल, याचा निर्णय आपल्या हातात नसतो. लोकांच्या भीतीवर आपला काबू नसतो, आजूबाजूला पसरत असलेल्या अनेक विचित्र आणि काल्पनिक माहितीवर आपल्या वैयक्तिकरीत्या काहीच ‘कंट्रोल’ नसतो, तर अगदी सामान्य पातळीवर विचार करतो. या गोष्टींचा विचार करत आपण आपली ऊर्जा आणि वेळ किती फुकट घालवायची, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. अर्थात, बर्याच लोकांना अनियमित वा अनिश्चित वातावरण आवडत नाही.
असे लोक जेव्हा मार्गात जोखीम येईल, अशी अपेक्षा करतात तेव्हा त्यांचा रक्तदाब वाढतो. अशा प्रकारच्या शारीरिक प्रतिक्रियेमुळे आपल्याला आपली चिंता वाढली आहे, याचा अंदाज येतो, पण जेव्हा ही प्रतिक्रिया सूक्ष्म स्वरुपात असते तेव्हा आपल्या ती लक्षातही येत नाही. या सर्व शारीरिक प्रतिक्रिया सर्वसामान्य आहेत, पण त्या कधीकधी आपल्याला भावनावश होऊन वागायला प्रवृत्त करतात, आपला आत्मविश्वास कमी करतात म्हणून याअंतर्गत प्रतिक्रियांबाबत आपण तेवढेच सजग राहणे आवश्यक आहे. या जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे, त्यात बदल घडत असतात. आपण या होणार्या बदलांना स्वीकारुन शकतो आणि एक अनुकूल असा निर्णय घेऊ शकतो. आयुष्य पूर्णतया नियंत्रित करु शकण्याचा विचार मुळातच अशक्य सत्य आहे. परंतु, अनिश्चितता ही आपण जितकी समजतो तितकी वाईट नाही. काही आधीच नकारात्मक घटना आणखी बिघडतात, पण काही सकारात्मक घटनासुद्धा अनिश्चिततेच्या काळात घडतात, त्या आयुष्याला अधिक विधायक आणि गतिशीलही बनवितात. आपण अनिश्चित वातावरणामुळे निर्माण झालेला त्रास जितका टाळायचा प्रयत्न करतो तितकी आपण ती परिस्थिती हाताळण्यास कमी पडतो, म्हणून अनिश्चित परिस्थितीवर व्यावहारिक किंवा मानसिक नियंत्रण मिळवण्यापेक्षा आपण ज्या गोष्टी नियंत्रित करुन जीवन किती सुसह्य करता येईल, याचा विधायक विचार करावा हे बरे! आजच्या काळात आपण हात धुण्यावर, मास्क घालण्यावर आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ सांभाळण्यावर नियंत्रण ठेवू शकतो.
सोशल मीडियावरील नकारात्मक आणि असत्य बातम्या टाळू शकतो. आपले आरोग्य उत्तम आहार आणि व्यायाम करुन सांभाळू शकतो, आपल्या मित्रमैत्रिणींच्या आणि कुटुंबीयांच्या संपर्कात राहू शकतो. आपण अधिक सर्जनशील होऊ शकतो. आपण आपल्या प्रसन्नतेची आणि सर्जनशीलतेची जबाबदारी स्वत: घेऊ शकतो, यासाठी सगळ्यात महत्त्वाचा गुण आपण आपल्यात विकसित करू शकतो तो म्हणजे परिस्थिती प्रतिकूल असताना सकारात्मक कसे राहायचे? ‘हम होंगे कामयाब एक दिन’ या वाक्यात असणारी प्रचंड ऊर्जा आणि विश्वास आत लोकांना अंतर्यामी जाणवतो. अनिश्चिततेबरोबर जीवन जगायचे, तर संयमाची गरज आहे. अनिश्चित परिस्थितीच्या प्रतिकल्पतेबरोबर वाहात जाण्याचे टाळायला पाहिजे. याशिवाय या परिस्थितीमुळे आपल्या मनात निर्माण होणार्या प्रतिक्रियांवर अवलंबून राहून नकारात्मक विचारांचे आणि कृतींचे अवडंबर माजविणेसुद्धा आपण टाळले पाहिजे. काय पुढे होणार आहे, काही कळत नाही. हे आपलीच नाही, तर लाखो-कोट्यवधी लोकांची मनःस्थिती आहे ती तशी नैसर्गिक प्रतिक्रिया आहे त्याची अतिशयोक्ती करणे जेवढे आपण टाळू तेवढे मनाला आपण सक्षम करू शकू. अनिश्चितता तुम्हाला रात्रभर आपण स्वत:ला यातून कसे वाचवू, या विचारांच्या गर्तेत जागवेल तरी किंवा आपण ही कठीण परिस्थिती कशी स्वीकाराल, या क्षणी कसं जगावं आणि जगण्याच्या धाडसाला कसं सामोर जाता येईल, याची प्रेरणा तरी देईल म्हणून जे आहे ते आहे हे स्वीकारत भल्याचा शोध घ्यावा आणि होईल ते चांगलं होईल, यावर विश्वास ठेवावा. आयुष्य अधिक सोप्पं होईल.
- डॉ. शुभांगी पारकर