या आठवड्यात येणार चार महत्वाचे IPO

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2021
Total Views |

BSE _1  H x W:


 
 
मुंबई : गुंतवणूकदारांसाठी हा आठवडा महत्वाचा ठरणार आहे. महत्वाचे IPO सहीत आर्थिक आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. एकीकडे गुंतवणूकीसाठी संधी आहे तर दुसरीकडे रणनिती ठरणार आहे. गेल्या आठवड्यातील शेअर बाजाराची कामगिरी सुमार होती.
 
सेंसेक्स ३७४ अंशांनी वाढून ५२ हजार ४७४ वर राहिला. निफ्टी १२९ अंशांनी वधारून १५ हजार ७९९ वर बंद झाला. याच दरम्यान, IT क्षेत्राशी निगडीत सर्वच समभागांना जास्त परतावा मिळाला. निफ्टी IT इंडेक्स ४.५ टक्क्यांनी वधारून २८ हजार २१७ अंकांवर पोहोचला. तिथे बँकींग इंडेक्सने शेअर बाजाराची निराशा केली.


बँकींग इंडेक्स २४४ अंशांनी घसरलेला आहे. येणारा आठवडा गुंतवणूकदारांसाठी आकर्षक ठरणार आहे. कारण सोमवारी १४ जूनपासून बाजारात 'श्याम मेटालिक्स' आणि सोना कॉमस्टार हे दोन आयपीओ खुले होणार आहेत. तसेच रिटेल आणि घाऊक महागाईचे आकडेही जाहीर केले जाणार आहेत. काय आहेत पाच महत्वाची कारणे जाणून घ्या...
 
 
कोरोनाची आकडेवारी : देशात कोरोनाची घसरती आकडेवारी ही अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी चांगली चिन्हे आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, संक्रमणाचा दर हा ५.७८ टक्क्यांनी घसरून ४.३९ टक्क्यांवर गेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९३.३८ टक्क्यांवरून वाढत ९५.९७ टक्क्यांवर पोहोचले आहे. शनिवारी देशभरात कोरोनाचे एकूण ८० हजार ४८७ रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान, एकूण ३३०० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ३२ हजार ५७८ रुग्ण बरे झाले आहेत.
अमेरिकेच्या व्याजदरात कपात : जगभरातील मार्केट्समध्ये नजर टाकली तर १६ जून रोजी फेडरल रिझर्व्हच्या व्याजदावर निर्णय घेतला जाऊ शकतो. याकडेही शेअर बाजाराचे लक्ष असणार आहे.
 
 
बाजारातील परकीय गुंतवणूकदार : परकी संस्थांची गुंतवणूक भारतीय शेअर बाजारासाठी महत्वाची आहे. परदेशी वित्तीय संस्था (FII) तर्फे भारतीय शेअर बाजारात जूनपर्यंत आत्तापर्यंत ४ हजार ७८८ कोटींची गुंतवणूक केली आहे. शेअर बाजार गेल्या महिनाभरात सात टक्क्यांनी वधारला आहे. स्थानिक गुंतवणूक आकडेवारी : सरकार या आठवड्याला महागाई आकडेवारी जाहीर करणार आहे. यात किरकोळ व घाऊक दर जाहीर केले जातील. व्यापाराची आकडेवारीही जाहीर केली जाईल.
 
 
आठवड्या चार आयपीओमध्ये गुंतवणूकीची संधी : गुंतवणूक दारांना या आठवड्यात चार IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी आली आहे. श्याम मेटालिक्स, सोना कॉमस्टार, डोडला डेयरी आणि किम्स हॉस्पिटल्स या चार कंपन्यांचे आयपीओ बाजारात आणले जाणार आहे. श्याम मेटालिक्स आणि सोना कॉमस्टार हे दोन आयपीओ १४ जून रोजी तर अन्य १६ जून रोजी खुले होणार आहेत.
 

 
बाजाराता चढता आलेख कायम
 
 
शेअर बाजारातील ब्रोकींग कंपनी मोतीलाल ओसवाल या वित्तीय सेवा देणाऱ्या कंपनीचे उपाध्यक्ष चंदन तापडीया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात शेअर बाजारात खरेदी जोमाने होईल. गुंतवणूकीच्या सेगमेंटमध्ये निफ्टी १५५०० आणि १६००० अंशांवर कामगिरी करेल. कोरोना निर्बंध हटल्याने सोने आणि हिऱ्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे या आठवड्यातील सोन्याचा भाव हा प्रति दहा ग्रॅम ४९ हजारांवर असणार आहे.






@@AUTHORINFO_V1@@