मुंबईत मुसळधार पाऊस ; चेंबूरमध्ये कोसळली घरे

12 Jun 2021 14:59:37

Chembur_1  H x
 
मुंबई : गेले काही दिवस मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे. अशामध्ये गुरुवारी मालाड येथे झालेल्या इमारत दुर्घटनेमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. यानंतर दहिसरमध्येही ३ घरे कोसळल्याची बातमी समोर आली. आता चेंबूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात असलेल्या विश्व गौतम नगरमध्ये घरे कोसळली आहेत. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 
 
 
चेंबूरमध्ये झालेल्या या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ही घरे कोसळली. यात एक तरुण अडकला होता. मात्र त्याला तात्काळ स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले आहे. घटनास्थळी पालिकेचे कर्मचारी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. अशाच प्रकारे मुसळधार पावसामुळे मालवणी दुर्घटनेम्ध्ये ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर १७ जण जखमी झाले होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0