मालाडमधील अनधिकृत बांधकामांची चौकशी करा : मंगल प्रभात लोढा

10 Jun 2021 12:34:40

M P lodha_1  H



मुंबई :
मुंबईतील मालाड मालवणी इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचे मृत्यू झाले आहे. या मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर दुसरीकडे जखमींना मदतही केली जात आहे. यावरूनच भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी शोक व्यक्त केला आहे. अवैध बांधकामाच्या मुद्द्यांकडे लोढा यांनी लक्ष वेधले.



ते म्हणतात,"मालवणीत पावसामुळे इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. तर ७ जण गंभीर जखमी आहेत. यासर्वांप्रती मी शोक व्यक्त करतो. तसेच या दुर्घटनेमुळे अवैध बांधकामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.माझी स्थानिक प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी याप्रकारची चौकशी करावी.


मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी एका ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या १ मजली चाळीवर कोसळले. त्यामुळे ११ जणांना जीव गमवावा लागला. सुरुवातीला एक दुमजली घर कोसळ्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर काही सेकेंदाने पुन्हा काहीतरी कोसळल्याचा आवाज आला. यानंतर स्थानिकांना चार मजली इमारत कोसळल्याचे लक्षात आले.

हा परिसर दाटीवाटीचा असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अरुंद असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहे. अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या, जेसीबी घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केले आहे. आजूबाजूच्या घरांनाही धोका असल्याने तेथील रहिवाशांना हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण दुर्घटना रात्री ११च्या सुमारास घडली. यात सुरुवातीला एक दुमजली घर कोसळले. यानंतर एकापाठोपाठ एक अशी तीन घर कोसळली. यातील एका घरात ७ जण राहत होते. त्यातील ५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या इमारतीच्या अगदी विरुद्ध दिशेला आणखी दोन इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे.
Powered By Sangraha 9.0