मालक आणि ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : विश्वास नांगरे पाटील

    दिनांक  10-Jun-2021 12:42:17
|


malad_1  H x W:मुंबई :
मुंबईतील मालाड मालवणी इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचे मृत्यू झाले आहे. या मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. तर दुसरीकडे जखमींना मदतही केली जात आहे. याप्रकरणी आता इमारतीचा मालक आणि ठेकेदाराविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.


त्यांनी माहिती दिली की,शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली. बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाड पश्चिमेला न्यू कलेक्टर कंपाऊड परिसरात एक रहिवाशी इमारत कोसळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारतीचा मालक आणि ठेकेदाराविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तौक्ते वादळात इमारतीला तडा गेला होता. त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं बांधकाम केले, अशी माहिती नांगरे पाटील यांनी दिली. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितले.


मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी एका ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या १ मजली चाळीवर कोसळले. त्यामुळे ११ जणांना जीव गमवावा लागला. सुरुवातीला एक दुमजली घर कोसळ्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यानंतर काही सेकेंदाने पुन्हा काहीतरी कोसळल्याचा आवाज आला. यानंतर स्थानिकांना चार मजली इमारत कोसळल्याचे लक्षात आले.


हा परिसर दाटीवाटीचा असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अरुंद असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहे. अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या, जेसीबी घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केले आहे. आजूबाजूच्या घरांनाही धोका असल्याने तेथील रहिवाशांना हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण दुर्घटना रात्री ११च्या सुमारास घडली. यात सुरुवातीला एक दुमजली घर कोसळले. यानंतर एकापाठोपाठ एक अशी तीन घर कोसळली. यातील एका घरात ७ जण राहत होते. त्यातील ५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या इमारतीच्या अगदी विरुद्ध दिशेला आणखी दोन इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.