योगी आदित्यनाथ उद्या पंतप्रधानांना भेटणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2021
Total Views |

yogi adityanath_1 &n


नवी दिल्ली :
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वी गुरुवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीदेखील भेट घेतली. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक ही प्रत्येक पक्षासाठी अतिशय महत्वाची असते. गत निवडणुकीत भाजपने सत्ता स्थापन केली होती, योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अनेक आघाड्यांवर महत्वाची कामगिरी आहे. त्याचप्रमाणे भाजपनेही योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचे जाहिर केले आहे.


त्याचवेळी उत्तर प्रदेश भाजप तसेच राज्य मंत्रिमंडळात काही महत्वाचे बदल केले जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीविषयी चर्चा केली. त्यानंतर आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावेळी राज्यातील प्रस्तावित बदलांविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, वरिष्ठ केंद्रीय मंत्री व पक्षसंघटनेतील ज्येष्ठ नेत्यांचीही ते भेट घेणार आहेत.

@@AUTHORINFO_V1@@