नव्या जनशताब्दीला प्रवाशांचा प्रतिसाद कमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2021
Total Views |

kokan_1  H x W:
 
रत्नागिरी : नविन एल. एच. बी. डब्यांच्या जनशताब्दी एक्सप्रेस ही रत्नागिरी येथे दाखल झाली. मुंबईतील पावसामुळे ही गाडी तब्बल २५ मिनिटे उशिरा स्थानकामध्ये दाखल झाली. नेहमी प्रवाशांनी भरलेली असलेल्या ही गाडीने यावेळी मात्र ६०% प्रवाशांनी प्रवास केला.
 
बुधवारी मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले. मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवर पाणी भरले होते. गुरूवारी सकाळी मात्र नविन एल एच बी डब्यांच्या जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वेळेवर निघाली. नंतर कोकण रेल्वे मार्गावर आल्यावर ही गाडी रखडली आणि रत्नागिरी येथे तब्बल २५ मिनिटे उशिरा आली.
 
 
जुन्या १४ ऐवजी १६डब्यांच्या या गाडीची लांबी जास्त आहे. त्याच प्रमाणे डब्यांची जागा बदलली आहे. नविन रचनेत गोव्याला जाताना इंजिन नंतर ६ दुसरा वर्ग- मधे ३ वातानुकूलित निळे डबे- परत ६ दुसरा वर्ग आणि १६वा पूर्व रेल्वे चा निळा- पांढरा विस्टाडोम डबा अशी रचना आहे. नविन एल एच बी डब्यांच्या गाडी मुळे प्रवासी क्षमता वाढणार आहे तसेच एक जादा वातानुकूलित डबा मिळणार आहे. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@