रिया चक्रवर्ती साकारणार द्रौपदीची भूमिका?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2021
Total Views |

Riya_1  H x W:
 
मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या आणि ड्रग्स तस्करी प्रकरणात चर्चेत आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिला 'टाईम्स'च्या ५० मोस्ट डिझायरेबल अभिनेत्रीच्या यादीत अव्वल स्थान दिले होते. तर आता तिला आगामी 'महाभारत' या चित्रपटासाठी द्रौपदीच्या भूमिकेसाठी विचारण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. यावर अद्याप अधिकृत घोषणा झाली नसून टी या भूमिकेसाठी विचार करत असल्याची बातमी देण्यात आली आहे.
 
 
 
गेली अनेक वर्ष चर्चेत असलेला बिग बजेट 'महाभारत' हा चित्रपट आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी या चित्रपटातील द्रौपदीच्या भूमिकेसाठी रिया चक्रवर्तीला विचारण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनु कपूर आणि इमरान हाश्मी, क्रिस्टल डिसूजा हे कलाकार काम करणार आहेत. रुमी जाफरी हा महाभारताशी संबंधित एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. यावेळी त्याने सागितले की, "हा चित्रपट आजच्या जगाशी मिळता-जुळता बनवला जाईल. त्यामध्ये मॉडर्न कन्टेंट वापरण्यात येणार आहे."
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@